ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंकजा मुंडेंचा विजयी रथ पक्षांतर्गत गटबाजीत रुतण्याचे महासंकेत.केजच्या बैठकीला हक्काच्या आमदार मुंदडाही अनुपस्थित.

पाठलाग न्युज/प्रतिनिधि:

पंकजा मुंडेंचा विजयी रथ पक्षांतर्गत गटबाजीत रुतण्याचे महासंकेत.केजच्या बैठकीला हक्काच्या आमदार मुंदडाही अनुपस्थित.

बीड : बीड लोकसभा मतदारसंघातील “महायुतीच्या” उमेदवार पंकजा गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपाचे नेते रमेशराव आडसकर यांनी केजमध्ये मेळावा आयोजित करून मोठे शक्तिप्रदर्शन करुन मराठा आरक्षण आंदोलंनाचा आमच्या उमेदवारास कसलाच अडथळा किंवा परिणाम नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु या मेळाव्याची चर्चा आडसकरांच्या शक्तिप्रदर्शनाऐवजी व मराठा आरक्षणाच्या अडथळ्यांऐवजी केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या अनुपस्थितीवरच चर्चिली जात आहे.केजमधील मेळाव्याला तालुकास्तरावरील महायुतीतील घटक पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना प्रश्न विचारून उमेदवार योग्य आहे का ? का बदलायचा, असा प्रश्न करून आपली उमेदवारी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निश्चित केल्याचे आवर्जून सांगितले. केज विधान सभा क्षेत्रात भाजपमध्ये अंतर्गत मोठी गटबाजी आहे.ही गटबाजी निपटून काढण्यासाठी स्व.गोपीनाथराव मुंडे पुरुन उरले होते;ते सतत म्हणत ‘पक्षात कितीही गट असले तरी,ते माझ्यासाठी एक होतात’ प्रस्तुत गटबाजीला एकत्रित करण्याचे तंत्र मुंडेंकडे होते परंतु,लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे या गटबाजीवर कसा विजय मिळवतात ? या वरच त्यांचा विजय आधारलेला असेल हे निश्चीत मानले आहे. स्थानिक केज मध्येच आमदार काकाजी गट,डाॅ.गट,बापू गट,बप्पा उर्फ भैय्या गट,असे अनेक भाजप अंतर्गत गट आहेत.या सर्व गटांची तोंडं ऐकमेंकाकडे करण्यात यश आले तरंच पंकजाताई चा विजय निश्चित मानला जात आहे. केज येथील भाजपा अंतर्गत मेळाव्याची चर्चा रंगलेली असतानाच दुसरी चर्चा सुरू होती ती मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या अनुपस्थितीची. या मेळाव्याला आमदार नमिता मुंदडा या निमंत्रित होत्या की त्यांना जाणीवपुर्वक डावलण्यात आले, का त्या स्वत:च मेळाव्याकडे फिरकल्या नाहीत, याची चर्चा मात्र, चांगलीच रंगली आहे.दरम्यान, प्रस्तुत गटबाजीचा विषय गांभीर्यपूर्वक घेतला तरंच पंकजाताईचा मार्ग सुखर होईल अशी सर्वस्तरातून चर्चा आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये