ताज्या घडामोडी

शिक्षण क्षेत्राला हादरवणारा ‘महाघोटाळा’: १००० कोटींच्या भ्रष्टाचारात मोठी कारवाई; संस्था अध्यक्ष,सचिव,मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यावर गुन्हे दाखल.

पाठलाग न्यूज / विभागीय प्रतिनिधी :

शिक्षण क्षेत्राला हादरवणारा ‘महाघोटाळा’: १००० कोटींच्या भ्रष्टाचारात मोठी कारवाई; संस्था अध्यक्ष,सचिव,मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यावर गुन्हे दाखल.

 विभागीय प्रतिनिधी: राज्यातील शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा मालेगावचा ‘शिक्षण घोटाळा’ आता अधिक गडद होत चालला आहे. विशेष सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार  २२ जानेवारी २०२६ रोजी या प्रकरणात मोठी घडामोड घडली असून, महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या विरोधात आणखी एक खळबळजनक गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

सुमारे १००० कोटींच्या या महाघोटाळ्यात आता संस्थाचालक, सचिव आणि शिक्षिका पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. ​नेमकं प्रकरण काय? मालेगाव येथील महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्थेमध्ये (या. ना. जाधव विद्यालय) बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात हा नवा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ​यांच्यावर दाखल झाला गुन्हा: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, सचिव जिभाऊ अहिरे, लिपिक निलेश वडगे, तत्कालीन मुख्याध्यापिका लीलाबाई जगताप आणि शिक्षिका सुवर्णा दिलीप अहिरे यांच्यावर फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या या टोळीने २०१२ पासूनच्या बॅकडेटेड नियुक्त्या दाखवून शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा पगार आणि फरकाची रक्कम लाटली आहे. विशेष म्हणजे, शैक्षणिक पात्रता नसतानाही बनावट शालार्थ आयडी तयार करून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्यात आला आहे.यापूर्वीच नाशिकचे शिक्षण उपसंचालक प्रवीण पाटील, उपशिक्षणाधिकारी उदय देवरे आणि अधीक्षक सुधीर पगार यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हा १००० कोटींचा आकडा गाठला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.विशेष तपासी पथका कडून या प्रकरणांचा सखोल तपास सुरू असून, या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. राज्य सरकारने स्थापन केलेले विशेष तपास पथक आता राज्यातील इतर शाळांचीही कुंडली शोधत आहे. मालेगावमधील या कारवाईमुळे राज्यातील भ्रष्ट संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयातील एकूण 15 ±३ त अशा 18 शिक्षक व कर्मचारी यांचे संपूर्ण रेकॉर्ड एस आय टी पथकाने हस्तगत केले असून,यातील बोगस कर्मचारी व संस्थाचालकावर लवकरच गुन्हे नोंद होण्याचा ओम नमो होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव शिक्षण घोटाळ्यात २२ जानेवारी २०२६ रोजी नवीन गुन्हा दाखल झाला आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या ५ पदाधिकाऱ्यांनी संगनमताने बनावट शिक्षक भरती दाखवून कोट्यवधींचा पगार लाटल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रातील माफियांचे धाबे दणाणले आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये