महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल च्या मतदानाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असूनही पार पडले मतदान. न्यायालयाचा अवमान झाल्याचे स्पष्ट.
मुंबई : महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल-एमएमसी) नियामक मंडळाच्या आजच्या मतदान प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) काल बुधवारीच स्थगिती दिलेली असतानाही आदेशाचा चुकीचा अन्वयार्थ लावून आज, गुरुवारीच मतदान प्रक्रिया राबवल्याचा निर्णय राज्य सरकारच्या (State Government) अंगलट आला असून, सुप्रीम कोर्टाने सरकारी प्रशासनाच्या या वर्तणुकीची गुरुवारी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. आज, गुरुवारी सुरू असलेली मतदानप्रक्रिया तात्काळ थांबवण्याचा आदेशही दिला असतानाही मतदान प्रक्रिया राबवण्यात आली आहे. ‘कालच्या सुनावणीमध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली होती. पुढील सर्व कार्यवाहीला स्थगिती दिली होती. तरीही तुम्ही आज मतदानप्रक्रिया राबवण्याचे कसे ठरवले?असा प्रश्न खंडपीठाने सरकारी वकिलांसमोर उपस्थित केला. त्यावर, आदेशातील ‘अवर सचिव श्रेणीचा नवा निवडणूक निर्णय अधिकारी नेमल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाऊ शकते, या वाक्याचा अर्थ आम्ही मतदानाला स्थगिती नाही, असा घेतल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. तेव्हा, ‘केवळ एकच मुद्दा असता तर कालच हे प्रकरण निकाली निघाले असते. कालच्या सुनावणीत सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली होती. आम्ही त्या वाक्याच्या आधारे तुम्हाला केवळ नियमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पुढे नेण्याचा एक मार्ग दिला होता. पण तुम्ही जो अन्वयार्थ लावत आहात तो चुकीचा आहे’, असे खंडपीठाने स्पष्ट केले. अखेरीस ‘आजची मतदानप्रक्रिया तात्काळ थांबवा आणि त्याविषयीच्या स्पष्ट सूचना सर्वत्र पोहोचवा. जे काही घडलेले आहे ते सीलबंद स्वरुपात ठेवा’, असा आदेश खंडपीठाने राज्य सरकारला दिला असल्याने मेडिकल कौन्सिल न्यायालय अवमानाच्या प्रक्रियेत सापडले असल्याचे स्पष्ट आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.