Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केजमधील बालरोग तज्ञ डॉ. दिनकर राऊताच्या शोध निबंधाला आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये स्थान.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

केजमधील बालरोग तज्ञ डॉ. दिनकर राऊताच्या शोध निबंधाला आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये स्थान.

बीड : वैद्यकीय क्षेत्र अलीकडे विविध कारणामुळे बदनाम होत चालले असताना आणि या क्षेत्रात जिकडे तिकडे सेवाभाव ऐवजी अर्थकारणाचा शाप लपेटला जात असतानाच मात्र केज सारख्या ग्रामीण व अविकसित शहरात नव्हे तर गावात बालकांना विविध वैद्यकीय सेवा, सुविधा व सोयी देत-देत त्यांच्यावरील असाध्य आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून बालकांना जीवनदान देणाऱ्या डॉक्टर दिनकर राऊत यांनी लिहिलेल्या बालकांच्या असाध्य व अज्ञात विकारावरील शोधनिबंधाला चक्क आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये स्थान मिळाल्यामुळे त्यांचे ” बालकांचा जीवनदाता ” अशा प्रकारची पदवी बहाल करत त्यांचे सर्व स्तरातील तमाम आई-वडिलांनी पालकांनी व तमाम नागरिकांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान त्यांच्या या शोधनिबंधाची दखल महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, अद्ययावत आरोग्य सेवा आणि त्यातही गुंतागुंतीच्या आजारावर उपचार केवळ मोठमोठ्या महानगरामध्येच मिळतात आणि बहुतांश शोध देखील महानगरातच लागत असतात, या संकल्पनेला फाटा देण्याचे काम केज सारख्या ग्रामीण भागात देखील होत आहे. बालरोग विषयातील अत्यंत जोखमीच्या, गुंतागुंतीच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यात सुप्रसिद्ध असलेल्या केज येथील योगिता बालरुग्णालयाच्या डॉ. दिनकर राऊत यांनी बीड जिल्ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या बालकांमधील जन्मजात चयापचय दोष (आयईएम) मधील मॅपल सिरप युरीन डिसीज या अतिदुर्मिळ आजारावरील उपचार आणि शोध निबंधास कंटेनरची पेडीयाट्रिक्सच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये (आयजेसीपी) स्थान मिळाले आहे. केज सारख्या ग्रामीण भागात राहून वैद्यकीय व्यवसाय करत असताना मिळालेले हे यश निश्चितच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद असे आहे.बालरोग क्षेत्रात जन्मजात चयापचय दोष (आयईएम) हा आजार अत्यंत दुर्मिळ असा मानला जातो. अतिदुर्मिळ असल्याने ते उपचारासाठी देखील एक आव्हान असते. केज तालुक्यातील योगिता बालरुग्णालयात असा एक रुग्ण दाखल झाला होता. त्या रुग्णाला जन्मल्याच्या आठव्या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जन्मल्यानंतर पहिले सहा दिवस व्यवस्थित असणारा रुग्ण नंतर मात्र अस्वस्थ झाला. त्या बालकाच्या मात्यापित्याच्या एका नवजात बालकाचे असेच दहाव्या दिवशी निधन झाले होते, हा इतिहास असल्याने या बालकाच्या उपचाराच्या संदर्भाने अर्थातच मोठे आव्हान निर्माण झालेले होते. केज सारख्या ठिकाणी उपलब्ध तपासण्या करण्यात आल्या, मात्र त्यातून निदान होत नव्हते. एमआरआय करण्यासारखी बालकाच्या कुटुंबाची परिस्थिती नव्हती. मात्र एबीजीच्या अहवालावरून हा जन्मजात चयापचय दोष (आयईएम) असू शकतो असे लक्षात येत होते. त्यावरून मग डॉ. दिनकर राऊत आणि त्यांची सारी टीम कामाला लागली. आता हा रुग्ण त्यांच्यासाठी आव्हान होता. एकतर ग्रामीण भागात संसाधने कमी असतात, त्यात असा दुर्मिळ रोग, कोणी फार काही सांगणारे नाही, मात्र या रोगावर डॉ. दिनकर राऊत आणि त्यांच्या टीमने केजमध्येच उपचार केले. तसेच पुढील काळातील प्रसुती संदर्भात देखील समुपदेशन केले.त्या आजाराची व, उपचारांची माहिती देणारा शोध निबंध डॉ. दिनकर राऊत यांनी लिहिला आणि साहजिकच हा जागतिक Group रीिल दुर्मिळ आजार असल्याने त्यांच्या या शोध निबंधाला कंटेंपररी पेडीयाट्रिक्सच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्या आजाराची, उपचारांची माहिती देणारा शोध निबंध डॉ.दिनकर राऊत यांनी लिहिला आणि साहजिकच हा जागतिक पातळीवरील दुर्मिळ आजार असल्याने त्यांच्या या शोध निबंधाला कंटेंपररी पेडीयाट्रिक्सच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये (आयजेसीपी) स्थान मिळाले आहे. हा शोध निबंध जन्मजात चयापचय दोष (आयईएम) या आजारावर उपचार आणि अधिकच्या संशोधनासाठी बालरोगतज्ञांना मार्गदर्शक ठरणार आहे. केज सारख्या ग्रामीण भागातील एका वैद्यकीय व्यवसायिकाला या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता मिळाली आहे. आपल्या क्षेत्राबद्दल समर्पण आणि टोकाच्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी असेल तर काय होऊ शकते याचे हे उदाहरण आहे. महानगरीय क्षेत्रात, कॉर्पोरेट रुग्णालयात रुग्णसेवेच्या दुर्दशेचे दशावतार समोर येत असताना केजच्या योगिता नर्सिंग होमचे डॉ. दिनकर राऊत, डॉ. सागर वाल्हेकर, डॉ. अंजनली मिश्रा, डॉ. रचना सिंग यांचे हे यश महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने दखल घेण्याजोगेच आहे हे निश्चित.

डॉ. दिनकर राऊत यांच्या बालकांच्या असाध्य रोगावरील शोधनिबंधाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल मध्ये स्थान मिळाल्याबद्दल डॉ. दिनकर राऊत यांचे हार्दिक अभिनंदन!!!

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये