मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न डिजिटल मीडिया परिषदेची हदगाव तालुका कार्यकारिणी जाहीर.
हदगाव/ ( प्रशांत खंदारे यांजकडून):जगभरात सोशल मिडियाचा स्फोट आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल मिडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन डिजिटल मिडियाचे संघटन बांधणी चालू असतानाच डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या सूचनेवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डिजिटल मीडिया कार्यकारणी जाहीर करण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून दिनांक 30/ 5 /2023 रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदाच नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याची कार्यकारणी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर दिलीप शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल मादसवार,व जिल्हा सरचिटणीस संघरत्न पवार यांच्या हस्ते डिजिटल मीडिया हदगाव कार्यकारणी जाहीर करण्यात आली. हदगाव तालुका अध्यक्ष मारोती काकडे. कार्याध्यक्ष महेंद्र धोंगडे. उपाध्यक्ष तुषार कांबळे .भगवान कदम .गजानन जिद्देवार .हदगाव तालुका सचिव शितलताई भांगे पाटील. मार्गदर्शक प्रशांत खंदारे. कोषाध्यक्ष राष्ट्रदीप वाढवे .सदस्य बालाजी घटबळे. सदस्य ज्योतिबा भांगे पाटील. सदस्य युदीष्ठीर देवसरकर व सर्व कार्यकारणीला नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .त्यावेळेस मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी कार्यकारणीला मार्गदर्शन केले.हादगाव तालुक्याच्या डिजिटल मिडिया कार्यकारिणीचे नांदेड जिल्ह्यातील सर्वस्तरातील मान्यवरांनी स्वागत व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.