ताज्या घडामोडी

नांदेड(उत्तर) चे आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन. “आमदार सांस्कृतिक महोत्सव”मध्ये खेळ रंगला पैठणीचा, चला हवा येऊ द्या ची मेजवानी, वर्षा उसगावकर करणार उद्घाटन!

पाठलाग न्युज:

नांदेड(उत्तर) चे आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.

“आमदार सांस्कृतिक महोत्सव”मध्ये खेळ रंगला पैठणीचा, चला हवा येऊ द्या ची मेजवानी, वर्षा उसगावकर करणार उद्घाटन!

नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरात तब्बल तीन दिवस विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेअसून, आपलं नांदेड आपला उत्सव, आमदार सांस्कृतिक महोत्सवाच्या अंतर्गत नांदेड शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य सांस्कृतिक सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजक तथा नांदेड चे युवासेना जिल्हाप्रमुख गणेश पाटील शिंदे यांनी केले आहे. याबाबत ची पत्रकार परिषदेत दिलेली सविस्तर माहिती अशी की, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात विकासाच्या कामासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा विकास निधी खेचून आणत सर्वांगीण विकासासाठी तळमळ ठेवून लोकांसाठी काम करणारे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांचा वाढदिवस एक जून रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. आ. कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपलं नांदेड आपला उत्सव, आमदार सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती चौक, वाडी बुद्रुक येथील आशीर्वाद गार्डन येथे पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी दिनांक 30 मे रोजी सायंकाळी पाच वाजता महिलांचा लोकप्रिय कार्यक्रम मिनिस्टर फेम “खेळ रंगला पैठणीचा” सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते होणार असून यासाठी सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर उपस्थित राहणारअसल्याची माहीती शिवसेना महिला आघाडी च्या नांदेड-हिंगोली च्या संपर्कप्रमुख सौ. रत्नमालाताई मुंडे यांनी आज नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतुन दिली . दिनांक 31 मे रोजी महाराष्ट्राला खदखदून हसवणारे चला हवा येऊ द्याचे कलाकार नांदेडमध्ये दाखल होणार आहेत.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, संपर्क प्रमुख आनंदराव जाधव साहेब, महिला संपर्क प्रमुख रत्नमालाताई मुंडे, युवासेना विस्तारक अमित गीते साहेब, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.हास्य कलाकार भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे यांच्यासह सतीश काशेवार, प्रसिद्ध गायिका अक्षदा सावंत, लावणी सम्राज्ञी मेघा महेंद्रकर, प्रसिद्ध गायक चेतन लोखंडे आपल्या सादरीकरणातून नांदेडकरांना मनोरंजन करणार आहेत. तर याच दरम्यान शिवालय बँकेच्या अध्यक्षा सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर आणि आ. बालाजीराव कल्याणकर यांची ज्युनिअर बच्चन हे प्रकट मुलाखत घेणार आहेत. या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश पाटील शिंदे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला पत्रकार परिषदेसाठी उपस्थित युवासेना जिल्हाप्रमुख गणेश पाटील शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, उपजिल्हाप्रमुख सचिन किसवे, तालुका प्रमुख संतोष भारसावडे, शहर प्रमुख शक्ती ठाकूर, युवासेना तालुका प्रमुख ओंकार सुर्यवंशी, शहर प्रमुख अमोदसिंग साबळे, विधानसभा प्रमुख गब्बू पाटील राहाटीकर, उपजिल्हाप्रमुख सचिन पोपळे, महेश तिडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये