ताज्या घडामोडी

जावक रजिस्टर मध्ये हेराफेरी करून, बीड जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळ्याचा महास्फोट! ​ बनावट याद्या चिकटवून शेकडो बोगस शिक्षकांना कोट्यवधींची ‘कायम मान्यता’! विभागीय शिक्षण उपसंचालकांचे ‘सर्जिकल स्ट्राइक’; तीन सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत!

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

जावक रजिस्टर मध्ये हेराफेरी करून, बीड जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळ्याचा महास्फोट!

​ बनावट याद्या चिकटवून शेकडो बोगस शिक्षकांना कोट्यवधींची ‘कायम मान्यता’!

विभागीय शिक्षण उपसंचालकांचे ‘सर्जिकल स्ट्राइक‘; तीन सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत!

​बीड/विशेष प्रतिनिध: बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात सन २००६ ते डिसेंबर २०१२ या कालावधीत झालेला बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा आता अत्यंत गंभीर आणि स्फोटक वळणावर आला आहे. शिक्षण विभागाच्या अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या ‘मूल जावक रजिस्टर’ (Outward Register) मध्ये चक्क छेडछाड करून, संगणकावर टाइप केलेल्या बनावट याद्या चिकटवून शेकडो बोगस शिक्षकांना मागील तारखांमध्ये बेकायदेशीरपणे ‘कायम मान्यता’ दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कोट्यवधींच्या महाघोटाळ्याने प्रशासकीय आणि शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. ​📰 काय आहे ‘मास्तर’ भरतीचा खरा खेळ? ​सन २०१२ पूर्वी बीड जिल्हा परिषदेचे तात्कालीन शिक्षणाधिकारी देवगुडे यांच्या स्वाक्षऱ्यांचा गैरवापर करून खाजगी शाळांमधील बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य मान्यता देण्यात आल्या होत्या. ​दरम्यान, २०१२ नंतर राज्य शासनाकडून नवीन शिक्षक भरतीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. या काळात संस्थाचालक आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने ‘मागील तारखांचा’ (Back Dated) खेळ खेळला गेला. जेव्हा या बोगस मान्यता पत्रांची पडताळणी सुरू झाली, तेव्हा मूळ जावक रजिस्टरमध्ये संबंधित क्रमांकांची कोणतीही नोंद आढळली नाही. मग काय… ही तफावत लपवण्यासाठी आणि चौकशीच्या तावडीतून वाचण्यासाठी महाभागांनी थेट शासकीय जावक रजिस्टर मधील हस्तलिखित नोंदींवर सर्रास टाईप केलेल्या बोगस याद्या चिकटवून दिल्या! ​⚖️ चौकशी समिती गठीत: भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार! ​या महाघोटाळ्याची गांभीर्याने दखल घेत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ यांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष आदेश काढून त्रिस्तरीय उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. ​चौकशी समितीत ‘हे’ अधिकारी दाखवणार खाक्या: १. सविता बिरगे (शिक्षणाधिकारी, माध्यमिक जिल्हा परिषद परभणी) – अध्यक्ष २. आसावरी काळे (उपशिक्षणाधिकारी-प्राथमिक, जिल्हा परिषद हिंगोली) – सदस्य ३. श्रीकृष्ण देशमुख (ज्येष्ठ अधिव्याख्याता, DIET आंबाजोगाई, जि. बीड) – सदस्य ​उपसंचालकांनी बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील सर्व आवक-जावक रजिस्टर आणि मूळ दस्तावेज तात्काळ ताब्यात घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच या चौकशीत किंचितही विलंब न लावता तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ​💣 तक्रारदारांचा आक्रमक पवित्रा: फौजदारी गुन्हे दाखल करा! ​भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष इंजि. सादिक इनामदार यांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षण आयुक्त सचिन प्रतापसिंग, एसआयटी प्रमुख डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस सहआयुक्त डॉ. मनोज कुमार शर्मा यांच्याकडे सविस्तर तक्रार नोंदवली आहे. ​”शासकीय दस्तावेजात छेडछाड करणे हा गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा आहे. या घोटाळ्यात सामील असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील तत्कालीन व सध्याच्या जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तसेच संबंधित शाळा संस्थाचालकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे. प्रशासनाने कडक कारवाई न केल्यास आम्ही उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठात जनहित याचिका दाखल करू!” — इंजि. सादिक इनामदार (अध्यक्ष, भ्रष्टाचार निर्मूलन समिती) ​🔍 ‘पाठलाग न्यूज’चा सवाल: ​शासकीय रजिस्टरवर बनावट कागद चिकटवण्याचे धाडस कोणाच्या आशीर्वादाने झाले? ​कोट्यवधी रुपयांची लाच खाऊन बोगस शिक्षकांना मान्यता देणारे ‘बडे साहेब’ गजाआड होणार का? ​चौकशी समिती निष्पक्ष अहवाल देणार की हा प्रकारही दाबण्याचा प्रयत्न होणार? ​बीडमधील शिक्षण क्षेत्रातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत ‘पाठलाग न्यूज’ आपला पाठपुरावा असाच सुरू ठेवणार!

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये