Breaking Newsक्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दोन संस्था चालकांच्या छळाला कंटाळून सेवकाची गळफास घेऊन आत्महत्या. आश्रम शाळामहर्षी उद्धव कराड व परळीचा संस्थाचालक संजय राठोड वर गुन्हा दाखल.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी:

दोन संस्था चालकांच्या छळाला कंटाळून सेवकाची गळफास घेऊन आत्महत्या.

आश्रम शाळामहर्षी उद्धव कराड व परळीचा संस्थाचालक संजय राठोड वर गुन्हा दाख.                          परळी: परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी श्रीनाथ गोविंद गिते (वय २५) या तरुणाने शुक्रवारी (२२ऑगस्ट २०२५) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो नुकताच वसंतनगर येथील आश्रमशाळेत अनुकंपा तत्त्वावर ‘सेवक’ म्हणून रुजू झाला होता. यापूर्वी त्याचे वडील गोविंद गीते हे तांबवा तालुका केज येथील शिक्षण महर्षी उद्धव कराड यांच्या बीड जिल्हा ऊसतोड कामगार मंडळ संचलित साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे बारा वर्षांपासून कधी वस्तीग्रह अधीक्षक तर कधी शिक्षक म्हणून सन 1999 ते 2010 पर्यंत उद्धव कराड यांच्या संस्थेत बिन पगारी म्हणून राबत होते. ऊसतोड कामगार मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या यादीत देखील गोविंद गीते यांचे नाव दिसून येते, याचाच अर्थ गोविंद गीते हे प्रस्तुत संस्थेचे फाउंडर असून सुद्धा उद्धव कराड याच्या आर्थिक मानसिक आणि सर्व प्रकारच्या जाचाला कंटाळून गोविंद गीते यांनी ऐन शिक्षक दिनाच्या दिवशी म्हणजे दि. 5 सप्टेंबर2010 रोजी स्वतःच्या जीवाचे बरे वाईट केले आणि त्यांच्या मृत्यूला ह्रदयविकाराचा झटका ही उपाधी देऊन गोविंद गीते यांचा अवतार संपवला. कर्मचारी गोविंद गीते त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी नोकरीवर अनुकंपा धर्तीवर घेऊ या बोलीवर गोविंद गीते यांचा मृत्यू मॅनेज केल्यानंतर, मयताचा मुलगा श्रीनाथ गीते याला साने गुरुजी विद्यालयात नोकरीवर घेण्यासाठी त्याच्या आईने उद्धव कराड कडे तगादा लावला परंतु उद्धव कराडने टाळाटाळ केली. दरम्यानच्या काळात श्रीनाथ च्या आईने पाठपुरावा करत व सामाजिक कार्यकर्ते टायगर ग्रुप जिल्हा अध्यक्ष राकेश जाधव यांनी समाज कल्याण अधिकारी यांची भेट घेऊन संस्थेवर रुजू करून घेण्यात यावे अशी मागणी केली होती,अन्यथा संस्थाचालका विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही टायगर ग्रुप ने दिल्यानंतर उद्धव कराड यांच्या संमतीने परळी येथील वसंतनगर च्या आश्रम शाळेत श्रीनाथ गीते रुसू झाला परंतु,रुजू झाल्यापासून त्यास प्रचंड मानसिक त्रास देणे व पगार न काढण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचे त्याच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा येथील आश्रम शाळेचे संस्थाचालक संजय राठोड यांनी त्यास जाणून बुजून काम करताना त्रास देणे, हीन वागणूक देणे, इतर शिक्षक व कर्मचाऱ्यासमोर आपमानास्पद वागणूक देणे, तू केजच्या संस्थाचालकाबरोबर भांडण का केलेस? तुझा पगार निघू देणार नाही अशा सातत्याने धमक्या दिल्या. त्यामुळे मयत श्रीनाथ गीते हा सतत तणावातच राहत होता. या सर्व मानसिक तणावातूनच त्याने अखेर राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येस आश्रमशाळा संस्थाचालक उद्धव कराड व संजय राठोड हेच जबाबदार असल्याचे फिर्यादीत त्म्हटले आहे. मयत श्रीनाथ गोविंद गीते याच्या आईच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात या दोन संस्था चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत. मयत श्रीनाथच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनुसार, केज येथील सानेगुरुजी निवासी विद्यालयाचे संस्थाचालक उद्धव माणिक कराड आणि परळी तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळा वसंतनगर तांडाचे संस्थाचालक संजय परशुराम राठोड यांनी श्रीनाथला नोकरीत बिना डोनेशन कायम न करण्यासाठी किंवा अनुकंपा तत्त्वावर नोकरी न देण्यासाठी मानसिक त्रास दिला आणि आर्थिक मागणी केली होती. या सततच्या मानसिक छळामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे श्रीनाथने हे टोकाचे पाऊल उचलले, असे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले. श्रीनाथची आई गंभीर आजाराने त्रस्त असून, त्याचे वडीलही कराड यांच्या संस्थेत नोकरी करत असतानाच शिक्षक दिनाच्या दिवशी मृत पावले होते. त्यामुळे कुटुंबाचा संपूर्ण भार मयत श्रीनाथ गीतेवर होता. मयत तरुणाची आई सुनीता गोविंद गिते यांनी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात प्रस्तुत दोन्ही संस्था चालका विरोधात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे उध्दव माणिक कराड आणि संजय परशुराम राठोड या दोन्ही संस्थाचालकांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 108, 351(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. केज येथील ऊसतोड कामगार मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालय केज चे सर्वेसर्वा उद्धव कराड यांच्यावर अशा प्रकारच्या अनेक तक्रारी असून, त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची विशेष केस केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयात चालू आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये