क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माझं लेकरू मेलं नाही, त्याला मारलंय…” – आईचा हृदयद्रावक टाहो!तक्रारीतुन न्याय मागणी. बीड जिल्ह्यातील आश्रम शाळांच्या गैर प्रकाराबाबत ची पुनरावृत्ती थांबवण्याची मागणी.

Pathlag news.

माझं लेकरू मेलं नाही, त्याला मारलंय…” – आईचा हृदयद्रावक टाहो!तक्रारीतुन न्याय मागणी.

बीड जिल्ह्यातील आश्रम शाळांच्या गैर प्रकाराबाबत ची पुनरावृत्ती थांबवण्याची मागणी.

परळी : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील वसंतनगर येथील आश्रमशाळेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी श्रीनाथ गोविंद गीते (वय २५) यांनी अनुकंपेवर कार्यरत असतांना आत्महत्या केली. त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसर हादरला असून, त्यांच्या आईने पोलीस ठाण्यात एक धक्कादायक फिर्याद दाखल केली आहे. “माझं लेकरू मेलं नाही, तर संस्थाचालक उद्धव कराड व संजय राठोड यांनी त्याचा आर्थिक व मानसिक छळ करून मारलं आहे,” अशा भावनिक आणि गंभीर आरोपांनी ती न्याय मागत आहे. या घटनेची चौकशी परळी ग्रामीण पोलीस करीत आहेत. घटना पुढे नेण्यासाठी तातडीने तपास सुरू करण्यात आला असला तरी, या प्रकरणातील संस्था चालक आरोपी हा एफ आय आर क्वेश्च करणे, अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न करणे व पोलीस अधिकाऱ्यांना मॅनेज करून प्रकरणाचे गांभीर्य संपवण्यात तरबेज असल्यामुळे फिर्यादी पक्षाने व पोलीस प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बीडमध्ये साधारणपणे अशा घटना आधीही घडल्या आहेत. मार्च 2025 मध्ये केज तालुक्यातील केळगाव येथील आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी १८ वर्षे पगार न मिळाल्याने आणि संस्थेतील त्रासामुळे फेसबुकवर भावनिक सुसाईड नोट (“श्रावणी बाळा, क्षमा कर…”, सहा व्यक्तींची नावे घेत) पोस्ट करून आत्महत्या केली होती . धनंजय नागरगोजे च्या मृत्यूपूर्वी फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी 6 जणांची स्पष्ट नावे घेतली असल्याचा उल्लेख करुन छळाचा आरोप केला होता . या घटनेनंतर आश्रमशाळा शिक्षकांनी आंदोलन जोर धरून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण पुकारले होते; न्याय, पगार, व आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली होती . आश्रम शाळेतील विदारक आणि भयानक वास्तव दाखवणारे हे प्रकरण नजरेआड होते ना होते तोच बीड जिल्ह्यातील नंदागौळ येथे दुसर्‍या तरुणाने अनुकंपेवर कार्यरत असतानाच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे; बीडमध्ये अशा पद्धतीच्या त्रासामुळे अनेकांना आयुष्य गमवावे लागते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे . श्रीनाथ गोविंद गीत आत्महत्या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर नोकरीस लागलेल्या श्रीनाथ गीते या तरुणाला संस्थाचालकाने अपमानास्पद वागणूक दिल्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. परळी तालुक्यातील नंदागौळ येथे ही घटना घडली. या प्रकरणात दोन संस्थाचालकांच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीनाथ गोविंद गित्ते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, श्रीनाथ गित्ते याचे वडील गोविंद गित्ते हे केज येथील साने गुरुजी आश्रम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. २०१० मध्ये त्यांचे हृदयविकाराने निधन झाले असल्याचे दाखवण्यात आले असले तरी, त्यांच्या मृत्यू बाबत उलट – सुलट चर्चा झालेली आहे. त्यानंतर २०१६ पासून गित्ते कुटुंब श्रीनाथ याला अनुकंपा तत्वावर नोकरीस घ्यावे अशी विनंती साने गुरुजी आश्रम शाळेच्या उदव कराड यांच्याकडे करत होते, परंतु त्याने गित्ते कुटुंबाची विनंती मान्य न करता त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. अनुकंपावर नियुक्ती दिली तर पाहिजे तेवढे डोनेशन मिळणार नाही या उद्देशाने उद्धव कराडने श्रीनाथ गीतेला आटकलीने बाजूला केले. यानंतर गित्ते कुटुंबाने प्रशासन दरबारी पाठपुरावा करत परळीत असलेल्या वसंत नगर तांडा येथील आश्रम शाळेत नोकरी मिळण्याबाबतचा आदेश देण्यात आला होता. यानंतर वसंत नगर येथील आश्रम शाळेवर रुजू झाल्यानंतर संस्थाचालक संजय राठोड यांनी देखील गित्ते कुटुंबाला त्रास दिला. तसेच श्रीनाथ याला अपमानास्पद वागणूक देत अतिरिक्त काम करण्यास भाग पाडले. या सर्व प्रकाराचा ताण सहन न झाल्याने श्रीनाथ याने दिनांक २२ ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊनआत्महत्या केली. या प्रकरणात आई सुनीता गोविंद गित्ते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय राठोड व उद्धव कराड या दोन संस्थाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही आरोपी फरार असून, अटकपूर्व जामीन साठी धडपडत करत असल्याची माहिती समोर येत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये