ताज्या घडामोडी
बीड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांना लोक रत्न पुरस्कार देऊन केले सन्मानित.
पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

बीड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांना लोक रत्न पुरस्कार देऊन केले सन्मानित.
बीड /प्रतिनिधी: बीड शहरास संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांच्या आदेशावरून अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब व पोलीस उपाधीक्षक पूजा पवार मॅडम व बीड जिल्हा वाहतूक शाखेचे सिंगम सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र पेट्रोलिंग करून अनेक बेशिस्त वाहन चालकावर कडक कारवाई करणारे असे दबंग पोलीस उपनिरीक्षक म्हणून ज्यांची बीड जिल्हा पोलीस दलामध्ये ख्याती आहे असे मा श्री विजय जाधवर साहेब यांना महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघ व श्री सोमेश्वर हनुमान मंदिर फाउंडेशन च्या वतीने लोक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले हा सन्मान लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष नवनाथ अण्णा शिरोळे पाटील यांच्या आदेशावरून लोकशाही पत्रकार संघाचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष बीबी वैद्य साहेब लोकशाही पत्रकार संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ सुनंदाताई केदार यांनी लोकरत्न पुरस्कार देऊन जाधवर साहेब यांना सन्मानित केले व त्यांच्या उत्कृष्ट पोलीस प्रशासकीय कर्तव्याबाबत समाधान व्यक्त करून त्यांना पुढील उत्कृष्ट पोलीस कर्तव्यासाठी सर्व उपस्थितांच्या वतीने मनस्वी शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी उपस्थित असलेले बीड शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी मुंडे साहेब शिंदे साहेब गाडे साहेब शेख मॅडम तसेच लोकशाही पत्रकार संघाचे मराठवाडा कार्याध्यक्ष आत्माराम जी वावळकर साहेब लोक लाडकी अभियानचे बाजीराव ढाकणे साहेब तसेच पाटील साहेब व बीड जिल्हा संघटक संजय देवा कुलकर्णी कुक्कडगावकर सह कुकडगाव चे पत्रकार पकु देवा गाडे टिकू देवा कुलकर्णी सह सर्व लोकशाही पत्रकार संघाची सर्व टीम उपस्थित होती.



