शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचारी अराजक आणि शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांचे थैमान माजलेले असतांनाच चंद्रपूर येथील गटशिक्षण अधिकारी एका शिक्षकांकडून दहा हजाराची लाचखोरी करतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वागुरीत अलगद सापडला आहे.याबाबत अधिक
माहीती अशी की, गटप्शिक्षणाधिकारी लोकेश खंडाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. सदर कारवाई चंद्रपूर लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली आहे. चंद्रपूर पंचायत समिती सावलीचे गटशिक्षणाधिकारी लोकेश खंडाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.सावली पंचायत समितीच्या चीचबोडी ग्रा. पं. अंतर्गत येत असलेल्या नवेगाव फाल येथील एका शीक्षकाच्या तेरा महीन्याच्या मासीक वेतनाच्या थकीत देयका संदर्भात टाळाटाळ करण्यात येत असल्याने तेथील तत्कालीन शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान गटशिक्षण अधिकारी खंडाळे यांना रंगेहात अटक केली. सदर कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.