ताज्या घडामोडी

​परळीत ‘लाच’खोरीचे फटाके; तहसीलदारांना बेड्या पडताच नागरिकांची आतषबाजी!

पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी :

​परळीत ‘लाच’खोरीचे फटाके; तहसीलदारांना बेड्या पडताच नागरिकांची आतषबाजी!

​परळी वैजनाथ: एरवी सण-उत्सवाला फुटणारे फटाके आज परळी तहसील कार्यालयाच्या दारात एका वेगळ्याच आनंदात फुटले. निमित्त होते, लाचखोर तहसीलदारांना पडलेल्या बेड्या! ‘साहेब’ एसी कॅबिनमधून थेट एसीबीच्या कोठडीत गेल्याचे समजताच, त्रस्त नागरिकांनी आपला संताप फटाके फोडून व्यक्त केला.​भ्रष्टाचाराचा ‘धूर’ निघाला! ​तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्यानंतर परळीत जणू दिवाळी साजरी झाली. सरकारी कार्यालयांत चपला झिजवूनही कामे होत नसल्याने दबलेला जनक्षोभ आज उघडपणे रस्त्यावर आला. “भ्रष्टाचाराचा हा रावण अखेर जळाला,” अशीच भावना यावेळी उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. ​यावेळी कन्हेरवाडी येथील शेतकरी तथा फिर्यादी हनुमंत फड यांनी प्रशासनातल्या अनागोंदीचा पाढाच वाचला. ते म्हणाले: ​”गेल्या तीन वर्षांपासून मी माझ्या शेताच्या रस्त्यासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. पण फाईल हलत नाही. इथे सामान्य माणसाचं काम नाही, तर फक्त पुढाऱ्यांच्या फोनवरची कामं होतात. अशा मनमानी कारभाराचा हाच निकाल हवा होता.” यामुळे थोडा का होईना खुर्चीचा माज उतरला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. ​परळी तहसील कार्यालयासमोर झालेली ही आतषबाजी केवळ आनंद व्यक्त करण्यासाठी नव्हती, तर ती प्रशासकीय मुजोरीला दिलेला इशारा होता. सामान्य माणसाला वेठीस धरणारे अधिकारी जेव्हा कायद्याच्या कचाट्यात सापडतात, तेव्हा कायद्यावरचा विश्वास पुन्हा एकदा ‘फटाक्यांच्या आवाजासारखा’ दुमदुमतो. ​संतप्त नागरिकांकडून परळीच्या तहसील कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी केली.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये