ताज्या घडामोडी

१४ लाखांचे सोने चोरणारी भामटी महिला गजाआड; बीड एलसीबीचा धाडसी ‘पाठलाग’ अन् चुंबळी फाट्यावर आवळल्या मुसक्या!.

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

१४ लाखांचे सोने चोरणारी भामटी महिला गजाआड; बीड एलसीबीचा धाडसी ‘पाठलाग‘ अन् चुंबळी फाट्यावर आवळल्या मुसक्या!

क्राईम प्रतिनिधी /बीड- पाटोदा: पाटोदा बसस्थानक परिसरात एका महिलेची बॅग कापून तब्बल ८ तोळे ४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्या महिलेचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. चुंबळी फाटा येथे सापळा रचून एलसीबीच्या पथकाने आरोपी महिलेला दणकेबाज कारवाई करत ताब्यात घेतले असून, तिच्याकडून १३ लाख ९७ हजार १६० रुपयांचा १००% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ​असा झाला थरारक ‘पाठलाग’ अन् कारवाई: पाटोदा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा (गु.र.नं. ०२६१/२०२६, कलम ३०३(२), ३(५) BNS) समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते. तपासादरम्यान एलसीबीच्या गुप्तहेरांना अत्यंत गोपनीय बातमी मिळाली की, या चोरीतील आरोपी महिला सोन्याचे दागिने विकण्याच्या तयारीत असून चुंबळी फाटा येथे थांबली आहे. ​बातमी मिळताच एलसीबी पथकाने क्षणाचाही विलंब न लावता चुंबळी फाट्याकडे धाव घेतली अन् पंचांसमक्ष घेराव घालून संशयित महिलेला ताब्यात घेतले. ​आरोपीची माहिती व हस्तगत मुद्देमाल: ​आरोपीचे नाव: सोजर सुरेश भोसले (वय ४५ वर्षे, रा. पारनेर, ता. पाटोदा, जि. बीड) ​जप्त मुद्देमाल: ८ तोळे ४ ग्रॅम सोने आणि १०,००० रुपये रोख (एकूण किंमत: ₹१३,९७,१६०/-) ​पोलिसांची धडक कामगिरी: ही धडक कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (आष्टी) विश्वजित खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ​स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे, अंमलदार सोमनाथ गायकवाड, अशोक दुबाले, बाळासाहेब सानप, आनंद मस्के, स्वाती मुंढे, नागरगोजे, अशफाक सय्यद, मनोज परजणे, अश्विनकुमार सुरवसे आणि सिद्धार्थ मांजरे यांच्या पथकाने ही धाडसी कामगिरी केली आहे. ​स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या भामट्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून एलसीबी पथकाचे कौतुक केले जात आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये