ताज्या घडामोडी

परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात; लाचेच्या मागणीने महसूल विभागात मोठी खळबळ.

GUNHEGARICHA PATHLAG

परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात; लाचेच्या मागणीने महसूल विभागात मोठी खळबळ.

​बीड: झिरवाळ मंत्री असलेल्या अन्न औषध व प्रशासन मंत्रालयातील लाचखोरीचं प्रकरण गाजत असतानाच, बीडच्या परळी वैजनाथ तहसील मध्ये बीड एसीबीने मोठा धमाका केला आहे. तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताना संशय आल्याने तहसीलदाराने टाळाटाळ केली, पण एसीबीच्या पथकाने चपळाईने सर्व पुरावे गोळा करून परळी तहसील चे तहसीलदार व्यंकटेश मुंडेंना बेड्या ठोकल्या असून, राज्यात एकामागून एक मोठ्या अधिकाऱ्यांवर लाचखोरीची कारवाई होत असल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे तर, सामान्य माणसाला लुबाडणाऱ्यांची आता खैर नाही! असे दिसते आहे. परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ताब्यात घेतलेआहे.सॉल्वन्सी प्रमाणपत्र’ देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही धडक कारवाई करण्यात आली असून, यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की,​मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराला आपल्या कामासाठी ‘ऐपतीचे प्रमाणपत्र’ हवे होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार मुंडे यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोडीनंतर ही रक्कम २० हजार रुपये देण्याचे निश्चित झाल्यावर ​तक्रारदाराने या संदर्भात एसीबीकडे धाव घेतली होती. लाचेची मागणी झाल्यानंतर तहसीलदार मुंडे यांना तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आला, त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली. मात्र, लाचेची मागणी केल्याचे ठोस पुरावे मिळाल्या नंतर एसीबीच्या पथकाने डिमांड वरून कारवाईचा फास आवळला.​महत्त्वाची बाब म्हणजे लाचेची मागणी करणे हा देखील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा असल्याने, पुरावे मिळताच मुंडे यांना आज शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले.​ही धडाकेबाज कारवाई बीडच्या एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. चालू वर्षातील ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.​सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, तहसीलदार कार्यालयातील इतर आर्थिक व्यवहारांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात लाचखोर प्रवृत्तींविरुद्ध कडक संदेश गेला आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये