ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या बीड मंडळ व विभागीय कार्यकारिणीची घोषणा; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जंगी स्वागत!

Pathlag news/Reporter.

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या बीड मंडळ व विभागीय कार्यकारिणीची घोषणा; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जंगी स्वागत!

​केज / प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या संघटन बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी बीड विभाग आणि बीड मंडळ कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. लातूर परिमंडळाचे अध्यक्ष मा. आर. एस. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि संघटनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा निवड प्रक्रिया कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. ​संघटनेची बांधणी अधिक मजबूत करणार ​यावेळी केंद्रीय उपसरचिटणीस मा. एन. डी. पोटभरे आणि लातूर परिमंडळ कोषाध्यक्ष मा.विष्णु तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनेची ध्येयधोरणे तळागाळातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी लढा देण्यासाठी कार्यक्षम व अभ्यासू कार्यकर्त्यांची फळी या कार्यकारिणीच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहे. ​नवनियुक्त बीड मंडळ कार्यकारिणी खालीलप्रमाणे: अध्यक्ष: अविनाश सोनकांबळे ​कार्याध्यक्ष: प्रदिप वाघमोडे ​सचिव: शेख मुजमील ​कोषाध्यक्ष: हनुमंत कांबळे ​उपाध्यक्ष: रमाकांत डिकले, विशाल रामेश्वर गायकवाड, त्रिबंक रोडे, सय्यद रशीद, बादशह खान. ​सहसचिव: विक्की वाघमारे, अतुल सिताप. ​मुख्य संघटक: नागेश हळगावकर, सतेज सोनवणे. ​प्रसिद्धी प्रमुख: महेश भोडंवे. ​“संघटनेचा विचार आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही नवनियुक्त टीम पूर्ण ताकदीने कटिबद्ध राहील,” असा विश्वास वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निवडीनंतर व्यक्त केला. ​सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव ​या निवडीनंतर शिवाजी घुले (केज), महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, लातूर परिमंडळ यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील सामाजिक आणि संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये