ताज्या घडामोडी

मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर अंकुशराव शिंदे!  *बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी ५ ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगर येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार.

पाठलाग न्युज.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर अंकुशराव शिंदे!

*बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी ५ ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगर येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार.

—————————————– अंबाजोगाई / प्रतिनिधी: बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा राज्य पोलीस दलातील अग्रगण्य नाव म्हणून ओळख निर्माण केलेले सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अंकुशराव शिंदे हे छत्रपती संभाजीनगर-मराठवाडा पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्तालय कार्यालयात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. त्यांच्या उमेदवारीमुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या राजकीय वातावरणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील पदवीधर तरुणांच्या विविध प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना पदवीधरांमध्ये निर्माण झाली आहे. सत्ताधारी असो अथवा विरोधक, पदवीधरांच्या अपेक्षांना अपेक्षित न्याय मिळाला नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या तीन टर्मपासून विद्यमान आमदारांकडून पदवीधरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही केला जात आहे. सत्तेत असतानाही उपेक्षा आणि सत्ता नसतानाही उपेक्षा, अशीच भूमिका आतापर्यंत राहिल्याची भावना अनेक पदवीधरांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.*पदवीधर तरुणांचा नवा चेहरा देण्याचा आग्रह* आत्तापर्यंत ज्या लोकांवर पदवीधरांनी विश्वास दाखविला, त्यांच्याकडूनच अपेक्षाभंग झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे यावेळी प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तीने पदवीधरांच्या प्रश्नांसाठी पुढे यावे, अशी अपेक्षा मराठवाड्यातील पदवीधर तरुणांकडून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील होळ गावचे रहिवासी आणि बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अंकुशराव शिंदे यांनी ही निवडणूक लढवावी, असा आग्रह मराठवाड्यातील पदवीधर तरुणांकडून केला जात असल्याचे सांगितले जात आहे. *पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेचा अनुभव* अंकुशराव शिंदे यांनी राज्य पोलीस दलात दीर्घकाळ सेवा बजावताना विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांच्या कार्याची पोलीस दलात वाखाणणी झाली असून, त्यांच्या सेवेला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरविण्यात आल्याचे सांगितले जाते. पोलीस दलाच्या माध्यमातूनही त्यांच्या कार्याचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवताना सामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणे, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे, ही त्यांच्या सेवाकाळातील वैशिष्ट्ये राहिली असल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. निष्कलंक आणि उत्कृष्ट सेवेसाठी ओळख असलेले अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. *पदवीधरांच्या जीवनात सकारात्मक बदलाची अपेक्षा* मराठवाड्यातील पदवीधर तरुणांसमोर रोजगार, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, शासकीय नोकऱ्या, उद्योग-व्यवसायाच्या संधी तसेच भविष्यातील करिअरचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि पदवीधरांच्या हक्कांसाठी आवाज उठविण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे. अंकुशराव शिंदे यांनी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा पदवीधरांच्या प्रश्नांसाठी उपयोग होऊ शकतो, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे पदवीधर तरुणांमध्येही नव्या नेतृत्वाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार* दरम्यान, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अंकुशराव शिंदे हे सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्तालय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे आतापर्यंतच्या प्रस्थापित राजकीय समीकरणांना धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नेमकी कोणती भूमिका मांडतात, पदवीधरांसाठी कोणते मुद्दे घेऊन ते मैदानात उतरतात आणि निवडणुकीची त्यांची रणनीती काय असते, याकडे आता संपूर्ण मराठवाड्यातील पदवीधरांचे लक्ष लागले आहे. बीड जिल्ह्याच्या मातीतून राज्य पोलीस दलात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे अंकुशराव शिंदे आता पदवीधरांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याने त्यांच्या उमेदवारीची पुढील भूमिका आणि त्याला मिळणारा प्रतिसाद याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये