ताज्या घडामोडी

‘पुनर्वापरातून पुनर्निर्माण’ : महाराष्ट्रात राज्यातील पहिल्या ‘महा आर-पेट बॉटल’ अभियानाचा भव्य शुभारंभ ​पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ठाण्यातून अभियानाची सुरुवात.

पाठलाग न्यूज / विशेष प्रतिनिधी :

‘पुनर्वापरातून पुनर्निर्माण’ : महाराष्ट्रात राज्यातील पहिल्या ‘महा आर-पेट बॉटल’ अभियानाचा भव्य शुभारंभ ​पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ठाण्यातून अभियानाची सुरुवात.

​कोका-कोला व पर्यावरण विभागाचा संयुक्त उपक्रम; बीड, संभाजीनगर, नाशिकसह १३ जिल्ह्यांत राबवणार मोहीम ​‘एक बॉटल पर्यावरण के नाम’ अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन.

​ठाणे: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिकच्या वाढत्या वापरावर नियंत्रण मिळवणे ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, ठाणे महापालिका आणि हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिल्या ‘महा आर-पेट बॉटल अभियाना’चा शुभारंभ राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ठाण्यातील हॉटेल ताज विवांता येथे मोठ्या थाटात पार पडला. ​प्लास्टिकचा पुनर्वापर करून पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या या उपक्रमाची संकल्पना ना. पंकजाताई मुंडे यांची असून, ठाण्यातून सुरू झालेले हे अभियान बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक यांसह महाराष्ट्रातील १३ प्रमुख ठिकाणी राबवले जाणार आहे. असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ​शासनाचा एकही रुपया न खर्च करता मोठा उपक्रम ​कार्यक्रमात बोलताना पंकजाताई म्हणाल्या, “प्लास्टिक अमर असले तरी त्याचे निसर्गावर होणारे दुष्परिणाम अत्यंत गंभीर आहेत. हे रोखण्यासाठी शासनाचा एकही रुपया खर्च न करता स्वयंसेवी संस्थांच्या (NGOs) मदतीने हा प्रकल्प राबवला जात आहे.” तसेच हॉटेल्स आणि मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या प्लास्टिक बॉटल्सचा पुनर्वापर करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे आणि ‘एक बॉटल पर्यावरण के नाम’ या भावनेतून मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. ​मान्यवरांची उपस्थिती व कौतुक ​या प्रसंगी कोका-कोलाचे चीफ पब्लिक ऑफिसर हिमांशू प्रियदर्शी यांनी ना. पंकजाताई मुंडे यांच्या या कल्पक पुढाकाराचे मनापासून कौतुक केले. ​या सोहळ्यास आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक, आमदार संजय केळकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, कोका-कोलाचे प्रोजेक्ट मॅनेजर के. के. जोसेफ यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक, शिवानी सुर्वे, अमित सियाल आणि डिनो जोसेफ यांसारख्या सिनेसृष्टीतील मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

​पृथ्वी प्रतिष्ठानचा संदेश: पर्यावरणाचे रक्षण ही केवळ सरकारचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. चला, प्लास्टिक पुनर्वापराच्या या मोहिमेत एकत्र येऊया आणि ‘महा आर-पेट’ अभियानाला यशस्वी बनवूया!”

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये