ताज्या घडामोडी

​जि. प. शाळा वरपगाव येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस निरीक्षक सूर्यतळ यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन.

पाठलाग न्युज/प्रतिनिधी :

जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर यश निश्चित; ‘मीही जि. प. शाळेचाच विद्यार्थी! —– केजचे पी.आय. राहुल सूर्यतळ.

पोलीस निरीक्षक, राहुल सूर्यतळ. 

​जि. प. शाळा वरपगाव येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस निरीक्षक सूर्यतळ यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन.

केज/प्रतिनिधी: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वरपगाव येथे केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पी.आय.) श्री.राहुल सूर्यतळ यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी, “जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण आयुष्यात कोणतेही यश प्राप्त करू शकतो. अपयश ही यशाची पहिली पायरी असते; त्यामुळे अपयश आले तरी खचून न जाता जिद्दीने उभे राहून यशाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे,” असा मोलाचा सल्ला दिला. ​पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून त्याचा सतत पाठलाग करण्याचे आवाहन केले. “मीसुद्धा जिल्हा परिषदेचाच विद्यार्थी आहे. गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण विकास साध्य करायचा असेल, तर तो जिल्हा परिषद शाळेतच उत्तम प्रकारे होतो,” असा सार्थ अभिमान त्यांनी यावेळी व्यक्त केला. ​या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून गावच्या प्रथम नागरिक (सरपंच) श्रीमती अमृता कांबळे उपस्थित होत्या.याप्रसंगी पोलीस पाटील श्री. अरुण गालफाडे, सामाजिक कार्यकर्त्या उर्मिलाताई गालफाडे, सर्व पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर लेझीम, संगीत कवायत व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली. ​हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक पाटील यु. डी., सहशिक्षक शिंदे ए. ए., घुले एस. व्ही., एकशिंगे जी. सी. व शामल बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. पी.आय. सूर्यतळ यांच्या या भेटीमुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वा उत्साह निर्माण झाला.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये