ताज्या घडामोडी

माजलगावात जालन्याच्या ACB पथकाची जबरदस्त कारवाई! सहाय्यक निबंधक सुरज जगदाळेसह तिघेजण १३ हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात.

पाठलागnews.

माजलगावात जालन्याच्या ACB पथकाची जबरदस्त कारवाई! सहाय्यक निबंधक सुरज जगदाळेसह तिघेजण १३ हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात.

​माजलगाव /प्रतिनिधी: बीडच्या सहकार विभागात सध्या लाचखोरीने कळस गाठला असल्याचे चित्र समोर आले असून, माजलगाव येथील सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक सुरज जगदाळे व कार्यालयीन अधीक्षक सतीश शेरखाने या दोघांसह एका खाजगी व्यक्तीला १३ हजार रुपयांची लाच घेताना जालन्याच्या ACB पथकाने रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधिक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या नेतृत्वा खाली(ACB) जालना येथील पथकाने मंगळवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास ही धडक कारवाई केली. या धडक कारवाईमुळे माजलगाव शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि सहकार वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ​सावकारी परवान्यासाठी मागितली होती लाच ​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माजलगाव शहरातील शाहूनगर भागात ‘शिक्षक पतसंस्थेच्या’ इमारतीवर सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधकांचे कार्यालय आहे. तक्रारदार यांना सावकारी परवाना हवा होता. हा परवाना देण्यासाठी कार्यालयातून तब्बल १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. मात्र, तडजोडीअंती १३ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार नोंदवली होती. ​एसीबीने रचला सापळा ​तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जालना एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सहाय्यक निबंधक कार्यालयात सापळा (Trap) रचला. दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान तडजोडीची १३ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना खालील तिघांना पथकाने रंगेहात पकडले: ​सुरज जगदाळे (सहाय्यक निबंधक, सहकार विभाग) ​सतीश शेरखाने (कार्यालयीन अधीक्षक) ​महेश फपाळ (खाजगी इसम/मध्यस्थ) ​गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू: लाचखोर अधिकाऱ्यांसह खाजगी इसमाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध माजलगाव येथील संबंधित पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिस्तsectionपर्यंत सुरू होती. ​ही धडक कारवाई जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाऱ्यांना चांगलाच चाप बसला असून, नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये