ताज्या घडामोडी

विलास घुले हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, गुन्हेगारांवरच फोकस करा, जातीचा रंग देऊ नका; आमदार नमिता मुंदडा यांची मागणी.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

विलास घुले हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, गुन्हेगारांवरच फोकस करा, जातीचा रंग देऊ नका; आमदार नमिता मुंदडा यांची मागणी.

​केज (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यासह केज विधानसभा मतदारसंघात सध्या खळबळ उडवून देणाऱ्या विलास घुले हत्या प्रकरणावर केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. “या प्रकरणाला कुठलाही जातीय किंवा राजकीय रंग न देता, ज्यांनी एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेतला आहे, केवळ त्या गुन्हेगारांवरच फोकस करून कारवाई करण्यात यावी आणि निष्पाप लोकांना यात अडकवू नये,” अशी मागणी त्यांनी केली आहे. ​आमदार नमिता मुंदडा यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणावर सविस्तर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, “मी विधानसभेच्या सभागृहात हा प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले आहे.

तसेच या संदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीडचे पोलीस अधीक्षक (SP) यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकूण ९ आरोपी दिसत असून, त्यापैकी ६ जणांना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य वार करणारे आणि इतर ३ आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी मी पोलिसांकडे सतत पाठपुरावा करत आहे”. ​खासदार पुत्राच्या नावाच्या चर्चेवर म्हणाल्या… या हत्या प्रकरणाच्या संशयाची सुई बीडचे नवनियुक्त खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ सोनवणे यांच्याकडे जात असल्याच्या आणि सप्लीमेंटरी एफआयआरमध्ये त्यांचे नाव आल्याच्या चर्चेवर बोलताना आमदार मुंदडा म्हणाल्या, “तिथल्या स्थानिक लोकांचे म्हणणे होते की त्यांनी मारहाण सुरू असताना खासदारांच्या मुलाचे नाव ऐकले होते. काल रात्री एसपी साहेबांनी स्वतः घटनास्थळाला आणि केज पोलीस ठाण्याला भेट देऊन लोकांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. या प्रकरणात आता विशेष तपास पथक (SIT) स्थापन होऊन चौकशी होईल. या निष्पक्ष चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल आणि जे निर्दोष आहेत त्यांना वगळण्यात येईल”. खासदारांनी लावलेल्या राजकीय दबावाच्या आरोपावर बोलताना त्यांनी, “सगळ्यांचेच मत एकच आहे की या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर आले पाहिजे,” असे स्पष्ट केले. ​जिल्ह्यात जातीय सलोखा राखण्याचे आवाहन मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यात निर्माण झालेल्या मराठा विरुद्ध ओबीसी (वंजारी) वादावर चिंता व्यक्त करताना आमदार मुंदडा म्हणाल्या, “या प्रकरणाला ‘कास्टिझम’चा (जातीय) अँगल न देता, ज्याने गुन्हा केला आहे त्यालाच शिक्षा झाली पाहिजे . आपण सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि शांतताप्रिय नागरिकांची ही जबाबदारी आहे की आपण केवळ गुन्हेगारांवर फोकस करावा. कोणताही जातीचा किंवा राजकीय चष्मा न लावता, गेली अनेक वर्षे जसा आपला जिल्हा शांततेत चालत आला आहे, तसाच तो पुढेही शांत राहिला पाहिजे. एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघातील शांततेवरच माझा मुख्य फोकस आहे” असेही त्या म्हणाल्या.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये