ताज्या घडामोडी

नियोजित कालावधीत स्व गणना करावी—तहसीलदार अशोक भंडारे.

पाठलाग न्युज /केज:

नियोजित कालावधीत स्व गणना करावी—तहसीलदार अशोक भंडारे.

केज /प्रतिनिधी: देशातील १६ वी राष्ट्रीय जनगणना २०२७ अंतर्गत स्वगणना (Self Enumeration) करण्यासाठी केज तालुक्यातील सर्व कार्यालयीन प्रमुखांनी योग्य ती कार्यवाही करुन नियोजित कालावधीत स्वगणना करावी, असे निर्देश तहसीलदार अशोक भंडारे यांनी दिले .देशातील १६ वी राष्ट्रीय जनगणना अंतर्गत घर यादी व घरगणना हा पहिला टप्पा १ मे पासून सुरू झालेला आहे. सदर जनगणनेत नागरिकांसाठी स्वगणना (Self Enumeration) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना स्वतः ही माहिती ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. ही प्रक्रिया सुलभ, वेगवान व वेळेची बचत करणारी असल्याने याबाबत व्यापक जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. स्वगणना प्रक्रियेसाठी नागरिकांनी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मोबाईल क्रमांक व OTP द्वारे लॉगिन करावे, आपल्या घराचे अचूक जिओ-लोकेशन नोंदवावे, कुटुंबाशी संबंधित सुमारे ३३ प्रश्नांची अचूक माहिती भरावी, प्रभावी जनजागृती करण्याचे आवाहन स्वगणना बाबत नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती करावी, कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वगणना पूर्ण करण्यास प्रोत्साहित करावे, सूचना फलक, सामाजिक माध्यमे व स्थानिक प्रसारमाध्यमांद्वारे माहिती प्रसारित करावी, आवश्यकतेनुसार नागरिकांना मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार अशोक भंडारे यांनी केले आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारा ११ अंकी Self Census (SC) क्रमांक सुरक्षित ठेवावा, १५ मेनंतर प्रगणक संबंधित घरांना भेट देतील. त्या वेळी नागरिकांनी केवळ ११ अंकी SC क्रमांक उपलब्ध करून दिल्यास माहितीची पडताळणी त्वरित होऊन वेळेची बचत होईल. अशी माहिती केज चे तहसीलदार यांनी दिली.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये