ताज्या घडामोडी

भाजपाच्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे यांचे विरुद्ध केज पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गून्हा दाखल.

पाठलाग न्युज.

भाजपाच्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे यांचे विरुद्ध केज पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गून्हा दाखल.

सुतगिरणीचे अध्यक्ष विजयप्रकाश ठोंबरे.

केजमध्ये एकच खळबळ.

मा. आ. ठोंबरेताई आणि त्यांचे यजमान विजय ठोंबरे यानी नुकताच केज येथे  शिवसेनेचा मेळावा घेतला.

केज : केज तालुक्यातील उमरी शिवारातील अपुर्ण अवस्थेत सलेल्या आणि भाजपाच्या मा.आ. संगीताताई ठोंबरे यांच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी प्रकरणी केज पोलीस ठाण्यात बीड येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल तुरुकमारे यांच्या फिर्यादीवरून मा. आ.संगीता ठोंबरे यांचे पती व सूतगिरणीचे चेअरपर्सन  विजयप्रकाश ठोंबरे व तत्कालीन लिपिक राजकुमार वाव्हळे यांच्याविरुद्ध  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने  केज तालुक्यातच नव्हे तर बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मा. आ. ठोंबरे यांचा शिवसेनेत प्रवेश.

याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की,बीड येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल तुरूकमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीच्या  मुलासह एकूण 464 विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रति माहिती अधिकारातून मिळवून, त्याचा उपयोग त्यांच्या परवानगी शिवाय लोकनेते गोपीनाथ मुंडे सूत गिरणीच्या सभासद यादीत परस्पर नावे दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जात पडताळनी कार्यालयाकडून सन 2017 ते 2020 या कालावधीत तब्बल 464 अर्जदारांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रति मिळवून त्यांचा गैरवापर स्वतःच्या फायद्यासाठी व सूतगिरणीच्या नोंदणीसाठी परस्पर करण्यात आला. व संबंधिताच्या परवानगी शिवाय सूत गिरणीच्या रेकॉर्डवर संबंधितांना परस्पर सभासद दाखवून ती यादी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग कार्यालयाकडून प्रमाणित करून घेतल्याचे समोर आले होते  ही बाब लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी संबंधित कार्यालयाकडे धाव घेतली आसता,सूत गिरणी प्रशासनाने संबंधित यादी रद्द देखील  केली होती.मात्र, यामागील संगनमत व फसवणुकीचा प्रकार उघड झाल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे पुढील तपास करीत आहेत. या फसवाफसवी च्या आरोपा मुळे एका वर्षात तिन वेळा पक्ष बदलणार्या व नुकत्याच  उपनेत्या म्हणून शिवसेनेत रूजू झालेल्या भाजपच्या मा. आ. सगिताताई ठोंबरे या कारवाई मुळे चांगल्याच अडचणीत सापडल्याची चर्चा आहे.  अखेर सत्याचा विजय झाला…. या प्रकरणी अनिल तुरूकमारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही हो सकता..या म्हणी प्रमाणे शेवटी उशिराका होईना न्याय मिळाला. व शेवटी सत्याचा विजय झाला. @ तत्कालीन समाज कल्याण आयुक्तांच्या अडचणी वाढल्या… दरम्यान, या प्रकरणी बीड येथील तत्कालीन सहाय्यक समाज कल्यान आयुक्त रवींद्र शिंदे व इतरांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केज पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, तपासा अंती सुतगिरणी बाबतीत आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तत्कालीन समाज कल्याण आयुक्त रवींद्र शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये