प्रसिध्द दंतरोगतज्ञ डॉ.अश्विनी शेप घुले या पसायदान संस्थेच्या पद्मी डॉ. सिंधूमाई सपकाळ सेवारत्न पुरस्काराने सन्मानित!
शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा.
बीड/प्रतिनिधी: अंबाजोगाई शहरातील प्रसिध्द दंतरोग तज्ञ तथा सुप्रसिद्ध गायक सुभाषराव शेप यांच्या कन्या डॉ. अश्विनी शेप-घुले यांना ढेकणमोहा येथील ज्ञानदीप सेवाभावी संस्था संचलित पसायदान सेवाप्रकल्प आणि स्त्री शक्ती प्रतिष्ठान बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पद्मश्री डॉ. सिंधूमाई सपकाळ सेवारत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला असून,. या पुरस्काराचे वितरण शनिवार दि. 14 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता ज्ञानदीप च्या पसायदान सेवा प्रकल्प ठिकाणी ढेकनमोहा येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती ज्ञानदिप बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गोवर्धन दराडे यांनी दिली आहे. ज्ञानदीप सेवाभावी संस्थे च्या पसायदान सेवा प्रकल्पाच्या वतीने समाजातील अनाथ, बेघर, भटके, वंचित, आत्महत्याग्रस्त शेतकरी व कैद्याच्या मुलांसाठी सामाजिक व शैक्षणिक निवासी प्रकल्प राबवला जातो. या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत असंख्य मुलांना आधार देवून त्यांचा सामाजिक व शैक्षणिक उत्कर्ष करण्यात आलेला आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे अनोखे उपक्रम राबविले जातात व सर्व घटकांना प्रवाहात सामील करुन घेतले जाते. याचाच एक भाग म्हणून महिला दिनाचे औचित्य साधून येत्या शनिवार दि. 14 मार्च रोजी ढेकणमोहा येथील ज्ञानदीप सेवाभावी संस्था संचलित पसायदान सेवा प्रकल्प आणि स्त्रीशक्ती प्रतिष्ठान बीड यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केलाआहे. हा पुरस्कार अंबाजोगाई येथील प्रसिध्द दंतरोगतज्ञ तथा महागायक सुभाष शेप यांच्या कन्या डॉ. अश्विनी ऋषिकेश घुले-शेप यांना जाहिर झाला असून,. डॉ. अश्विनी घुले यांचे दंतरोग विषयात मोठे योगदान आहे,आणि त्यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. त्यांचे पती डॉ. ऋषिकेश घुले हे सुध्दा दंतरोग विषातील निष्णांत डॉक्टर असून,त्यांचाही आरोग्य क्षेत्रात लौकिक आहे. डॉ. अश्विनी घुले यांना पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल सर्वस्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. डॉक्टर अश्विनी घुले- शेप यांना ज्ञानदीप संस्थेचा आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामाबद्दल पुरस्कार बहाल झाल्याबद्दल पाठलाग परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.