ताज्या घडामोडी

नर्सिंग क्षेत्रात करिअरच्या अथांग संधी — विजयकांत मुंडे. ​केज येथील कृष्णाई इन्स्टिट्यूट ऑफ बी.एस्सी.नर्सिंग कॉलेजतर्फे राज्यस्तरीय ‘सीपीडी’कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

नर्सिंग क्षेत्रात करिअरच्या अथांग संधी — विजयकांत मुंडे.

​केज येथील कृष्णाई इन्स्टिट्यूट ऑफ बी.एस्सी.नर्सिंग कॉलेजतर्फे राज्यस्तरीय ‘सीपीडी’कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन.

विजयकांत भैय्या मुंडे

प्रतिनिधी/​बीड:नर्सिंग क्षेत्राला आजच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी सरकारी निमसरकारी आणि खाजगी रुग्णालयांसह रेल्वे, महानगरपालिका आणि शैक्षणिक संस्थांमध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्यामुळे जास्तीत जास्त युवक युतीने याअभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यात यावा ,असे प्रतिपादन रेणुका माता कृषी विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा मा. जि. प.सदश्य विजयकात(भैय्या) मुंडे यांनी केले.रेणुका माता कृषी विकास प्रतिष्ठान देवगाव ता. केज. संचलित,कृष्णाई इन्स्टिट्यूट ऑफ बीएससी नर्सिंग कॉलेज, केज च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘कंटिन्यूअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट’ (CPD) कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रविवारी या कार्यक्रमाचे दिमाखात आयोजन करण्यात आले होते. ​या कार्यक्रमाचे उद्घाटन विजयकांत मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव अतुल (दादा) मुंडे, डॉ. मुहाम्मद मुजामुले, डॉ. आशिष गरजे, डॉ. लक्ष्मीकांत तांदळे, ॲड. नारायण सिरसाट, आणि महादेवराव जायभाये यांची प्रमुख उपस्थिती होती. ​या राज्यस्तरीय कार्यक्रमात नर्सिंग क्षेत्रातील बदलत्या प्रवाह आणि कौशल्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. नर्सिंग क्षेत्र हे केवळ सेवा नसून ते एक उत्तम करिअरचे साधन कसे बनू शकते,यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्था समन्वय नवनाथ काकड सर, सानप साहेब, राहुल कोकणे सर, युवराज सानप सर, अशीच मुल्ला सर, तुषार खाडे सर, तसेच कॉलेजचे प्राचार्य प्रविण खुणे सर, प्रविण जरांगे सर, सतिश चौरे सर, नितिन मोराळे सर आणि सुनिल पवार सर यांनी विशेष परिश्रम घेतले. ​या मेळाव्याला शासकीय व खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, अधिपरिचारिका आणि नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये