क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
केजमध्ये पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; प्रियकरासह सासूवर गुन्हा दाखल!
पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

केजमध्ये पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; प्रियकरासह सासूवर गुन्हा दाखल!
केज: प्रतिनिधी पत्नीचे अनैतिक संबंध आणि सासरच्या मंडळींकडून मिळणारी अपमान जनक वागणूकीला कंटाळलेल्या आणि सहन न होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून केज शहरातील फुलेनगर भागातील ४४ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे.आश्रुबा शिवाजी जाधव असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.