क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुन्हेगारीच्या चर्चापटलावर पुन्हा केज मध्ये “दहशतवादाचा” डंका. दहशतवादी कारवायांचा संशय असलेला केजमधला वॉन्टेड आरोपी अहमुद्दीन कौसर काझी ATS च्या ताब्यात!!

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

गुन्हेगारीच्या चर्चापटलावर पुन्हा केज मध्ये “दहशतवादाचा” डंका.

दहशतवादी कारवायांचा संशय असलेला केजमधला वॉन्टेड आरोपी अहमुद्दीन कौसर काझी ATS च्या ताब्यात!!

अहमुद्धीन कौसर काजी

केज : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृन हत्येच्या चर्चेने बीडच्या केज चे नाव गुन्हेगारी क्षेत्राच्या काळ्या यादीत समाविष्ट झाल्याची चर्चा थांबते ना थांबते तोच परिसरात अनेक गुन्हे घडत असतानाच केज शहरातील रोजा मोहल्ला येथे वास्तव्यास असणार्या व दहशतवादी कारवायांचा संशय असलेल्या अहमुद्दीन कौसर काझी याला संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या युनिटने ताब्यात घेतल्यामुळे केज शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले असून, केज सारख्या प्लेन शहरातुन सुद्धा गुप्त आणि सुप्त पद्धतीने दहशतवादी कारवाया होत आहेत की काय?असा संशय बळावला आहे.याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, ​मिळालेल्या माहितीनुसार, “धार्मिक कार्याच्या नावाखाली लोकांकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या उकळणे, आयकर विभाग, शासनाची फसवणूक करणे, एकाच बँकेत पाच खात्यावर ४ कोटी ७३ लाखांची रक्कम आढळून आल्याप्रकरणी पात्रुड येथील गुलजार-ए-रजा या बोगस ट्रस्ट विरोधात छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून ट्रस्टच्या चार विश्वस्तांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. एटीएसने मुजम्मिल नूर सय्यद याला पात्रुड येथून तर अहमद्दउद्दीन कैसर काझी याला केज येथून पकडले आहे. अन्य दोघे फरार आहेत. छत्रपती संभाजीनगर एटीएसकडून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील विविध ट्रस्ट व एनजीओंची माहिती संकलित केली जात असतांना गुगलवर केलेल्या पडताळणीत त्यांना “गुलजार-ए-रजा” हे ट्रस्ट आढळून आले. सदरील ट्रस्टच्या स्वतंत्र संकेतस्थळावर माजलगाव तालुक्यातील येथील सत्तार गल्ली पात्रुड, भाटवडगाव असा पत्ता आढळून आला. हे धार्मिक ट्रस्ट वेगवेगळ्या कार्यात सहभागी आढळले. वेबसाईटवर अक्सीस बँकेचे खाते क्रमांक देऊन लोकांकडून देणग्या उकळल्या जात होत्या. एटीएसने लातूरच्या अॅक्सीस बँक, मार्केट यार्ड शाखेत केलेल्या चौकशीत गुलजार-ए-रजा ट्रस्टच्या नावाने एकाच ग्राहक ओळख क्रमांकावर पाच बँक खाती उघडण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या खात्यांमधून लोकांकडून प्राप्त होणाऱ्या देणगी थेट जमा होत असल्याची खातरजमा एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केली असता रक्कम ट्रस्टच्या बँक खात्यावर जमा झाल्याचे स्टेटमेंटवरून समोर आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे काढले पॅनकार्ड बँकेतील केवायसीची पडताळणी केली असता ट्रस्टच्या नोंदणी क्रमांकात तफावत आढळली. ट्रस्टने वापरलेला नोंदणी क्रमांक हा प्रत्यक्षात अन्य संस्थेचा असल्याचे स्पष्ट झाले. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे चौकशी केली असता गुलजार-ए-रजा ट्रस्ट महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत नसल्याचे समोर आले. ट्रस्टने दर्पण पोर्टल, आयकर विभाग व बँकेत वेगवेगळे आणि बनावट नोंदणी क्रमांक वापरून कागदपत्रे सादर केल्याचे तपासात उघड झाले, बनावट कागदपत्रांच्या आधारे पॅनकार्ड काढून आयकर विभागाची फसवणूक केल्याचाही प्रकार समोर आला आहे. कर चुकवे गिरीच्या उद्देशाने खोटे बँक विवरणपत्र आयकर विभागाकडे सादर करण्यात आले. एकाच Axis बँकेत पाच खात्यावर रक्कम. “गुलजार-ए-रजा” या बनावट ट्रस्टच्या नावाने लातूर येथील अॅक्सीस बँकेच्या मार्केट यार्ड शाखेमध्ये पाच खात्यांत एकूण ४ कोटी ७३ लाख ६७ हजार ५०३ रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण निधी धार्मिक कार्याच्या नावाखाली लोकांकडून गोळा करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात येत असल्याचे सुकृत दर्शनी चौकशीत समोर आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस जमादार मोहम्मद मोहसीन मोहम्मद जमीर शेख यांनी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुलजार-ए-रजा ट्रस्टचा अध्यक्ष इम्रान शेख कलीम शेख रा. सदर बाजार अंबाजोगाई, उपाध्यक्ष सय्यद मुजम्मिल सय्यद नूर, रा. सत्तारगल्ली पात्रुड ता. माजलगाव, सचिव अहमदुद्दीन कैसर काझी रा. रोजा मोहल्ला केज व विश्वस्त तौफिक जावेद काझी रा. मुसा मलबारी चाळ, अंधेरी पश्चीम, मुंबई यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (डीएनएस) २०२३ चे कलम ३१८(४), ३३५, ३३६ (२), ३४० अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, बीड जिल्ह्यातील माजलगाव, अंबाजोगाई व केज पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही मोठी कार्यवाही करण्यासाठी छत्रपती संभाजी नगरच्या एटीएस युनिटला मोलाचे सहकार्य केले असल्याचे दिसून आले.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये