Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बुलढाणा अर्बन बँक बंद होणार ही अफवा; खातेदारांनी घाबरू नये, बँकेचे स्पष्टीकरण!

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

बुलढाणा अर्बन बँक बंद होणार ही अफवा; खातेदारांनी घाबरू नये, बँकेचे स्पष्टीकरण!

​केज / प्रतिनिधी(दि. ३० डिसेंबर): ​बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बंद होणार असल्याची अफवा शहरात पसरल्याने आज येथील बँक शाखेत खातेदारांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, बँकेने ही बातमी निव्वळ अफवा असून खातेदारांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये, असे स्पष्ट आवाहन केले आहे. ​अफवेमुळे भीतीचे वातावरण: ​अचानक पसरलेल्या या अफवेमुळे खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक खातेदारांनी आपले पैसे आणि सोने सुरक्षिततेच्या दृष्टीने काढून घेण्यासाठी बँकेत गर्दी केली.

केज शाखेतील खातेदारांची गर्दी

बुलढाणा अर्बन बँक गोल्ड लोन सुविधा देत असल्याने अनेक खातेदारांनी आपले सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे. बँक बंद होणार या चर्चेमुळे सोने सोडवून घेण्यासाठी पैसे भरावे लागणार या चिंतेने अनेक ठेवीदारांना सतावत होते. ​बँक व्यवस्थापन सतर्क, व्यवहार सुरळीत: ​सध्या या अफवेमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बँक व्यवस्थापन अत्यंत सतर्क झाले आहे.

बुलढाणा अर्बनचे रिजनल मॅनेजर श्री मगर यांनी खातेदारांना शांत राहण्याचे आवाहन केले.

बँक मॅनेजर आणि सर्व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत बँकेत थांबून व्यवहार सुरळीत सुरू ठेवत आहेत. केज ​पोलिसांचे सहकार्य आणि आवाहन: ​कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. “खातेदारांनी संयम बाळगून रांगेत उभे राहून व्यवहार करावेत व गोंधळ करू नये,” असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

​बँकेकडून स्पष्टीकरण आणि दिलासा: ​बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक पूर्णपणे सुरक्षित आणि सुरळीत कार्यरत आहे. बँक बंद होण्याची बातमी केवळ निराधार अफवा आहे. बँकेच्या कामकाजावर कोणत्याही अफवेचा परिणाम झालेला नाही. खातेदारांनी या अफवांवर विश्वास न ठेवता आपले दैनंदिन व्यवहार शांतपणे करावेत. तसेच आम्ही सर्व कर्मचारी 24 तास बँकेत हजर आहोत. व्यवहारासाठी न घाबरता बँक व्यवस्थापनाशी संपर्क साधावा असे,असे आवाहन बँक प्रशासनाने केले आहे. ​खातेदारांना नम्र विनंती: ​कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. बँकेचे सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत आणि आपले पैसे व सोने सुरक्षित आहेत. अधिकृत माहितीसाठी थेट बँक व्यवस्थापनाशी संपर्क साधावा असे आव्हान बुलढाणा अर्बन बँक केज शाखेच्या व्यवस्थापनाने केले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये