ताज्या घडामोडी

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण अपघातात आज सकाळी निधन.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण अपघातात आज सकाळी निधन.

​केज | पाठलाग न्यूज वृत्तसेवा: केज तालुक्याचे तरुण आणि कर्तव्यदक्ष तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी एका भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ हा अपघात घडला असून,या घटनेमुळे संपूर्ण महसूल प्रशासन आणि केज तालुक्यावर शोककळा पसरली आहे. ​प्राप्त माहितीनुसार, तहसीलदार राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना रेणापूर फाट्याजवळ त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. प्राथमिक अंदाजानुसार, कार वेगात असताना अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली असल्याचा प्रथमदर्शी अंदाज आहे.अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, तहसीलदार राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी ते कारमध्ये एकटेच होते यावरून ते स्वतःच ड्रायव्हिंग करत असावेत असा अंदाज आहे. या भयानक आणि अनाहुत ​घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-mortem) रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. केज येथे कार्यरत असलेले तहसीलदार ​राकेश गिड्डे हे एक कार्यक्षम आणि मनमिळावू अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने केज तालुक्यासह जिल्हा प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ​रेणापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये