ताज्या घडामोडी

अंबाजोगाईत एसीबीचा दणका; २५ हजारांची लाच घेताना सहकार अधिकारी रंगेहात अटक!

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

अंबाजोगाईत एसीबीचा दणका; २५ हजारांची लाच घेताना सहकार अधिकारी रंगेहात अटक!

​बीड: जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) जिल्ह्यात भ्रष्टाचारविरोधी कारवाईचा धडाका लावला असून,काल सोमवारी अंबाजोगाई येथे लाचलुजपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी (वर्ग-३) संतोष भंडारी यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे एका पतसंस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या विरोधात निबंधक कार्यालयात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या चौकशीत मदत करण्यासाठी आणि चौकशी अहवाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी संतोष भंडारी यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.​तक्रारदार आणि अधिकारी यांच्यात तडजोड होऊन अखेर २५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जालना एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, जालना एसीबीचे उपअधीक्षक बी. एस.जाधवर आणि त्यांच्या पथकाने सोमवारी दुपारी अंबाजोगाईत सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून २५ हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने भंडारी यांना रंगेहात ताब्यात घेतले. ​जालना एसीबीने गेल्या आठवड्यात माजलगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यासह एका खाजगी इसमावर कारवाई केली होती. त्यानंतर लगेचच अंबाजोगाईत ही दुसरी मोठी कारवाई केल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आरोपी संतोष भंडारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये