Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्राईम न्युजक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीयसंपादकीय

ज्ञानेश्वरा इंगळेच्या बनावट अपहरण नाट्याचा पोलीसच करत आहेत पर्दाफाष!! अपहरण नाट्याचा बेबनाव उघड झाल्याने ज्ञानेश्वर माऊली इंगळे वरच गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

ज्ञानेश्वरा इंगळेच्या बनावट अपहरण नाट्याचा पोलीसच करत आहेत पर्दाफाष!!

अपहरण नाट्याचा बेबनाव उघड झाल्याने ज्ञानेश्वर माऊली इंगळे वरच गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.

बीड : बीड जिल्ह्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण संपूर्ण राज्यभरात अग्नि ओकत असतानाच काही समाजकंटक या आगीवर तेल टाकून तापण्याचा प्रयत्न करत असतानाच केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे वास्तव्यास असलेले आणि अनेक गैरप्रकारात सर्वश्रुत असलेले कळंबा येथील माजी उपसरपंच ज्ञानेश्वर माऊली इंगळे यांनी काही व्यक्तींनी कंत्राटी कामे देण्याचे अमिष दाखवून आपले अपहरण केले आणि जवळचे दोन ते अडीच लाख रुपये लुटून एका अज्ञात स्थळी बांधून टाकल्याचा व आपणास लुटल्याचा व्हिडिओ व्हायरल करून पोलिसांना माहिती दिली परंतु सदरचा प्रकार हा बेबनाव आणि बीड जिल्ह्यातील तापलेले वातावरण एका विशिष्ट समाजाच्या विरोधात जास्त पेटवण्यासाठी व खाजगी व्यवहाराचे पैसे बुडवण्यासाठी तसेच नेत्यांना बदनाम करण्यासाठी केल्याचे उघड झाल्याने अशा प्रकारचा बेबनाव करणारे ज्ञानेश्वर इंगळे वरच गुन्हे दाखल केले जात असल्याचे समोर आले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाआहे. दोन दिवसा पूर्वी केज तालुक्यातील ज्ञानेश्वरमाऊली इंगळे या माजी उपसरपंचाने स्वतःच्या अपहरणाचा बनाव करून संबंधिताचे खाजगी व्यवहारातील पैसे बुडवण्यासाठी आणि ना.पंकजाताई मुंडे यांना गोत्यात आणन्याचा जो प्रयत्न केला ते अपहरण नाट्य पोलीस तपासात बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, आता या महाशयावरच गुन्हा दाखल केला जाणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघड झाल्यापासून बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशातच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बीडमधून थेट मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव घेत केस तालुक्यातील कळंब आंब्याचे मा. उपसरपंच पतीचं अपहरण झाल्याचं समोर आले होते. या प्रकरणाने बीड जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली होती. परंतु, हा अपहरणाचा सगळा प्रकारच बोगस व बनावटअसल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी चौफेर पर्दाफाश केला असून, चौकशी व तपास करून पोलिसांनी खरी परिस्थिती समोर आणली आहे.                            नेमका काय होता हा प्रकार आणि पोलिसांनी कसं या प्रकरणाचं बिंग फोडलं? ‘सकाळी पहाटे पाच वाजता आपल्याला मुंबईला जायचं आहे. आपल्याला पंकजाताईंकडून वीस लाखाचं पत्र आणायचं आहे, असे सांगून केज तालुक्यातील कोरेगाव येथील माजी सरपंच पुत्र दत्ता तांदळे यांनी आपल्याला केज पोलीस ठाण्यातून बाहेर निघालेल्या पांढऱ्या रंगाच्या गाडीत बसवले, आपले अपहरण केले आणि पाटोदा शहरातून चुंबळी फाट्या मार्गे नेले. मध्येच बंद पेट्रोल पंपाच्या एका खोलीत डांबले, आपल्या जवळ असलेले अडीच लाख रुपये दत्ता तांदळे व इतर दोघांनी लुटले. नंतर आपले साखळीने हातपाय बांधून कुलूप लावले, असा दावा केज तालुक्यातील माजी उपसरपंच ज्ञानेश्वर माऊली इंगळे यांनी केला होता. इतकेच नाही तर अपहरण करते तिघेजण बाहेर जाताच त्यांनी तिथून सुटका करवून घेत कुलूप लावलेल्या पायानेच थेट बीड पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले होते. ज्ञानेश्वर माऊली इंगळे यांच्या या दाव्याने बीडमधील अपहरणाच्या घटना थांबत नसल्याची टीका होऊ लागली होती. पण आता हा सगळा प्रकारच बोगस असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर माऊली इंगळे, व दत्ता तांदळे यांचा भागीदारीमध्ये मसाल्याचा व्यवसाय होता.इंगळे व तांदळे हे दोघेही एकाच तालुक्यातील आहेत. दोघे मिळून मसाल्याचा व्यवसाय करत होते. त्यातील पैशांवरूनच या दोघांमध्ये वाद झाले. ज्ञानेश्वर माऊली इंगळे यांच्याकडे काही पैसे फिरल्यामुळे देण्याघेण्याच्या व्यवहारातून वाद निर्माण झाल्यानंतर व्यवहार ढोलवण्यासाठी इंगळे यांनी हा सगळा बनाव रचला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. इंगळे ज्या ठिकाणाहून बाहेर पडले, त्याच ठिकाणी एका व्यक्तीने त्यांना पाहिले. पांढरे कपडे घालून समोरून गेले. त्यावेळी त्यांच्या पायात काहीही नव्हते. शेतातून जात होते, असा जबाब एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना दिला. या बेबनाव प्रकारावरून पोलिसांनी चौफेर तपास केल्यानंतर अशा प्रकारचा बेबनाव करून बीड जिल्ह्याच्या परिस्थितीला बदनाम करणाऱ्या व पोलिसांना खोट्या प्रकरणात कामाला लावणाऱ्या माजी उपसरपंच पती ज्ञानेश्वर माऊली इंगळे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये