ताज्या घडामोडी

राष्ट्रसंत भगवानबाबा चौकातील पोस्टरची अज्ञाताकडून विटंबना! *केज तालुक्यातील सातेफळ गावातील घटना; अज्ञात समाजकंटका विरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल. तालुक्यात शांतता राखण्याचे सहा.पो. अधिक्षक कमलेश मीना यांचे प्रसार माध्यमाद्वारे जनतेला आवाहन.

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

राष्ट्रसंत भगवानबाबा चौकातील पोस्टरची अज्ञाताकडून विटंबना!

*केज तालुक्यातील सातेफळ गावातील घटना; अज्ञात समाजकंटका विरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल.

तालुक्यात शांतता राखण्याचे सहा.पो. अधिक्षक कमलेश मीना यांचे प्रसार माध्यमाद्वारे जनतेला आवाहन.

=========================================== केज: केज तालुक्यातील मस्साजोग येथील घटना ताजी असतानाच आणि हे वातावरण गरम असतानाच सातेफळ गावातील राष्ट्रसंत भगवानबाबा चौकातील पोस्टरची अज्ञात समाजकंटका कडून फाडुन विटंबना करण्यात आली असल्याने समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्या अनुषंगाने केज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.सदरली घटनेची पोलिस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती राम वडगाव पोलीस ठाणे मार्फत देण्यात आली आहे. या बाबतची अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीड जिल्हाच नव्हे तर राज्यभरात जातीय तेढ निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनासह सीआयडी प्रशासनाने या घटनेमध्ये संपुर्ण लक्ष घातले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत वातावरण अगोदरच गरम असतानाच केज तालुक्यातील सातेफळ गावातील राष्ट्रसंत भगवानबाबा चौकातील पोस्टरची अज्ञात समाज कंटकाकडुन विटंबना करत पोस्टर फाडुन अवहेलना करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केज तालुक्यातील तरुणांनी केजच्या तहसीलदाराना निवेदन दिले असून, केज तालुक्यातील सातेफळ गावातील राष्ट्रसंत भगवानबाबा चौकात लावण्यात आलेले राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे पोस्टर काही अज्ञात समाज कंटकाकडुन फाडुन त्याची विटंबना केली असल्याचे म्हटले आहे.या कृत्यामुळे सर्वच जाती धर्मांच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदन केज तहसीलदार यांना देण्यात आले असून, निवेदनावर प्रदिप बिक्कड,रोहीत धस,अशोक जाधवर ,संतोष केदार, रमेश केदार,अशोक चौरे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या बाबत पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, या घटनेची पोलिसांनी तात्काळ दखल घेतली असून, केज उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक यांनी पोलिसांना सतर्क केले आहे तर, त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की केज तालुक्यातील सातेफळ गावातील दि.१ जानेवारी २०२५ रोजी रात्री १०:३० ते ११:००वाजण्याच्या दरम्यान काही अज्ञात समाजकंटकाने राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या प्रतिमेचे पोस्टर फाडून समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता B. N . S.२९९ नुसार अज्ञात समाजकंटकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात येणार असून त्याच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आणि कायद्याच्या विरुद्ध अशा प्रकारच्या घटना कोणीही करू नयेत. अन्यथा अशा समाजकंटका विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.तसेच कोणीही समाजात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करु नये.सर्वांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केज उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री कमलेश मिना यांनी प्रसार माध्यमांद्वारे जनतेला केले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये