Breaking Newsग्रामीण वार्ताताज्या घडामोडी

शिरूर घाटच्या शाळकरी विद्यार्थ्यांना करावी लागते गुडघाभर चिखलातून पायपीट. स्वातंत्र्याला 78 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही पांदण रस्ता ही अपूर्णच.

पाठलाग न्युज/प्रतिनिधी:

शिरूर घाटच्या शाळकरी विद्यार्थ्यांना करावी लागते गुडघाभर चिखलातून पायपीट.

स्वातंत्र्याला 78 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही पांदण रस्ता ही अपूर्णच.

केज/प्रतिनिधी: शिरूर घाट ते पिंपळगाव हा रस्ता निजाम काळापासून नकाशावर असला, तरी प्रत्यक्षात तो रस्ता अद्याप पर्यंत व्यवस्थित झाला नाही. या रस्त्यावर झालेली अतिक्रमणे तसेच काही शेतकऱ्यांनी मुद्दाम केलेली आडवा-आडवी यामुळे हा रस्ता वापरण्यासाठी बंदिस्त झाला आहे. हा रस्ता तात्काळ करण्यात यावा अन्यथा विद्यार्थ्यांसह पालक आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे गावातील 90% शेतकरी, शेतमजूर व जनावरे यांची जीवनवाहिनी असलेला हा रस्ता न झाल्यामुळे हजारो हेक्टर जमीन शेतीयोग्य असूनही पडीत टाकावी लागत आहे. पिके घेण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. याच रस्त्यालगत असलेली आवाड वस्ती, गीते वस्ती, केकान वस्ती येथील ग्रामस्थ व शाळकरी मुले दररोज ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करत आहेत. रस्त्याच्या अभावामुळे कित्येक आजारी जनावरांना वेळेवर डॉक्टर न मिळाल्याने ती दगावली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य, आमदार यांच्याकडे वारंवार निवेदने दिली आहेत. परंतु आजपर्यंत कोणीही याकडे लक्ष दिले नाही. निवडणुकांच्या काळात अनेक आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्ष कामासाठी कोणीही पुढे आले नाही. उलट, कोणी प्रयत्न केला तरी त्यावर राजकीय दबाव टाकून आडवा-आडवी करून काम बंद पाडले जाते. हे सगळं गावातील गलिच्छ राजकारणा मुळे घडत असल्याच्या प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिल्या आहेत.
@नंदकुमार मोराळे यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून रस्ता करण्याचा प्रयत्न केला आणि काम सुरूही केले. परंतु काही लोकांनी मुद्दाम अडथळे निर्माण करून ते काम पुन्हा थांबवलेले आहे. ————— या प्रश्नावर सरपंच वैजनाथ सांगळे यांनी तहसील कार्यालयाला रस्ता मोजणीसाठी पत्रव्यवहार केला होता. परंतु राजकीय दबावामुळे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले व दिलेल्या तारखेला अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. सध्याच्या परिस्थितीत गावातील नागरिक अतिशय हतबल झाले आहेत. जर प्रशासनाने याची दखल तातडीने घेतली नाही, तर ग्रामस्थ विद्यार्थ्यांसह आत्मदहन करण्याच्या मनस्थितीत आहेत. प्रशासकीय यंत्रणा, केज चे  कर्तव्यदक्ष तहसीलदार यांनी या प्रश्नांकडे लक्ष वेधून तात्काळ या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये