क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बदलापूर चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील शाळेच्या फरारी संस्थाचालक अध्यक्ष व सचिव यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला.

पाठलाग न्युज/क्राईम प्रतिनिधी:

बदलापूर चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील शाळेच्या फरारी संस्थाचालक अध्यक्ष व सचिव यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला.

मुंबई:बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झालेला आहे तर, दुसरीकडे चिमुकलींचा अत्याचार झालेल्या संबंधित शाळेच्या संस्थाचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत आज 1अक्टोबर रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली असून, बदलापूर प्रकरणातील आरोपी असलेल्या शाळेच्या ट्रस्टींना आता मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. ट्रस्टींचा कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
घटनेची थोडक्यात माहीती अशी की, बदलापूर येथे ऑगस्ट महिन्यात एका शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाला होता, ज्या शाळेत हा किळसवाणा प्रकार घडला, त्या शाळेचे अध्यक्ष,सचिव आणि विश्वस्तांनी याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी आज १ ऑक्टोबर रोजी मा.मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. बदलापूर घटनेनंतर पोलिसांनी संस्था चालकांविरोधात देखील पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. मात्र अद्याप ट्रस्टींना अटक केलेली नाही.त्यानां फरारी घोषित केले आहे. ट्रस्टींची अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू आहे. बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत स्युमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. त्यांच्यावरदेखील सुनावणी सुरू आहे.सुनावणीत मा.न्यायालयाने अनेक प्रश्न पोलिसांना विचारले आहेत. अक्षय शिंदेच्या डोक्यातच का गोळी मारण्यात आली. पोलीस गोळी डोक्यात मारतात की पायावर असे सवाल न्यायालयाने विचारले. तीन गोळ्या झाडल्या त उरलेल्या दोन कुठे गेल्या? चार पोलीस एका व्यक्तीला नियंत्रित करू शकत नव्हते का? असा सवाल करत ज्या पोलिसाला गोळी लागली त्याला लागलेली गोळी आरपार गेली की घासून गेली, असाही सवाल न्यायाधीशांनी केला. न्यायाधीशांनी पोलिसांना अक्षयने खेचले ते पिस्तुल होते की रिव्हॉल्व्हर होते? या सुनावणी सोबतंच शाळेच्या ट्रस्टींना अध्याप अटक का केली नाही ? असा प्रश्न उपस्थित करत सन्माननीय न्यायालयाने आज सम्धित शाळेच्या पदाधिकार्‍यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

 

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये