Breaking Newsक्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीड शिक्षण क्षेत्रातील महाघोटाळ्याच्या ‘एसआयटी डील’ ऑडिओ क्लिपमुळे खळबळ: व्हायरल ऑडिओ क्लिप संबंधित अधिकाऱ्यांच्या अटकेची मागणी!

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

बीड शिक्षण क्षेत्रातील महाघोटाळ्याच्या ‘एसआयटी डील’ ऑडिओ क्लिपमुळे खळबळ:

व्हायरल ऑडिओ क्लिपशी संबंधित अधिकाऱ्यांच्या अटकेची मागणी!

​बीड: बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात उघडकीस आलेल्या महाघोटाळ्याप्रकरणी, तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि सध्या लातूर येथील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि केजचे वादग्रस्त निलंबित गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्यातील कथित ‘एसआयटी डील’ संदर्भातील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून, या क्लिपमध्ये शिक्षण विभागातील काही बड्या व्यक्तींची नावे उच्चारली गेली असल्यायामुळे प्रस्तुत प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी तिघा प्रमुख अधिकाऱ्यांना अटक करून त्यांची चौकशी करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राज्यअध्यक्ष इंजि. सादिक इनामदार यांचेसह सर्व स्तरातून अटकेची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबतचा सविस्तर वृतांत असा की, ​व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये राज्यस्तरीय एसआयटी (विशेष तपास पथक) मार्फत सुरू असलेल्या चौकशीत कथितरित्या ‘डील’ करण्यासंदर्भात चर्चा ऐकू येत आहे. या संभाषणादरम्यान, काकाजी, मुकुंद, वाणी, चाटे, दानवे, मुळे अशी काही नावे उच्चारली गेली आहेत. या नावांची चर्चा शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडवून देत आहे. ​शिक्षण क्षेत्रातील ‘गॉडफादर्स’ उघड करण्याची मागणी ​शिक्षण क्षेत्रातील हा महाघोटाळा केवळ नागनाथ शिंदे किंवा लक्ष्मण बेडसकर यांच्यापुरता मर्यादित नसून, यामागे काही मोठे ‘गॉडफादर्स’ कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ऑडिओ क्लिपमध्ये उच्चारलेली ही नावे या घोटाळ्याशी संबंधित आहेत का? त्यांचा या संपूर्ण प्रकरणातील नेमका सहभाग काय आहे? हे उघडकीस आणणे अत्यंत आवश्यक आहे. ​या पार्श्वभूमीवर, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी, ऑडिओ क्लिपमधील व्यक्तींचा शिक्षण क्षेत्राशी असलेला संबंध उघड करण्यासाठी तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. ​अटकेची मागणी झालेले अधिकारी ​घोटाळ्याचे संपूर्ण जाळे आणि पडद्यामागील सूत्रधार शोधून काढण्यासाठी, क्लिप मधील उल्लेखित अधिकाऱ्यांना तत्काळ अटक करून त्यांची कसून चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे. ऑडिओ क्लिप्स संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीतूनच ऑडिओ क्लिपमध्ये उच्चारलेल्या काकाजी, मुकुंद, वाणी, चाटे, दानवे, मुळे या व्यक्तींचा शिक्षण क्षेत्रातील सहभाग स्पष्ट होऊन घोटाळ्यातील संपूर्ण साखळी उघड होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. ​उच्चस्तरीय चौकशीची गरज ​बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या या महाघोटाळ्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या गंभीर स्वरूपामुळे, या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निःपक्षपाती चौकशी करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये