बीड जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा.
बीड: जिल्हा नियोजन सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला तसेच नव्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जितिन रहेमान, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. जान्सन यांनी मागील बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणीची स्थिती तपासली आणि आलेला निधी वेळेत खर्च करावा व प्रलंबित निधीचे प्रस्ताव वेळेत मंजूर करुन घ्यावेत, विकासकामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच निधीचा योग्य वापर करून जनतेला त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा यावर त्यांनी भर दिला. संबधित अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांतील प्रगतीचा अहवाल सादर केला. जिल्हाधिकारी यांनी बैठकीच्या समारोप प्रसंगी सर्वांना सहकार्याने काम करण्याचे आवाहन केले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.