आज मराठा सेवासंघाच्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराचे केज मध्ये वितरण.
केज: मराठवाडा सेवा संघाने जाहीर केलेल्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण आज दि 7 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता गटसाधन केंद्र केज येथे होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली असून, केज येथील गट साधन केंद्रामध्ये होणाऱ्या प्रस्तुत भव्य दिव्य कार्यक्रमाला सर्व क्षेत्रातील नागरिकांनी व मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज येथील गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे असणार आहेत. यावेळी जाहीर केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी महादेवी फुलसुरे, मोहन ढाकणे, व्यंकट चव्हाण, संध्याराणी कोल्हे, सुरेखा मोराळे, नवनाथ घुगे, रेखा धेंडे, संगीता नवले नाईकवाडे, नितीन हावळे, स्वाती वरपे, बाबुराव तांबडे, बालासाहेब लोखंडे, आश्रुबा गायकवाड, पुंडलिक पोपळघाट, शामल जाधव या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे कार्यक्रमासाठी डॉ. अशोक थोरात संचालक, आरोग्य विमा महामंडळ, महाराष्ट्र राज्य, तहसीलदार राकेश गिड्डे, शैलेश फडसे मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड नगरपरिषद यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील आदर्श सेवानिवृत्त शिक्षक जी.बी गदळे, नागनाथ जाधव, डॉ. भाऊसाहेब चाळक, दत्तात्रय चाटे, हनुमंत भोसले, हनुमंत घाडगे, डॉ. हनुमंत सौदागर, जनार्धन सोनवणे, शिवाजी ठोंबरे, विनोद शिंदे, गोविंद शिनगारे, राहुल खोडसे, यांची उपस्थिती लाभणार आहे. सदरील पुरस्कार वितरण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघ शाखा केजच्या वतीने करण्यात आले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.