केज विधानसभेच्या प्रायोजित आ.संगिताताई ठोंबरे यांच्या गाडीवर आता ईतक्यात दगडफेक.
केज: केज विधानसभा मतदारसंघासाठी मिळेल त्या पक्षाकडून उभे राहण्यासाठी तत्पर व सतर्क तयारीत असलेल्या माजी आमदार सौ.संगिताताई ठोंबरे एका कार्यक्रमासाठी दहिफळ (वड.) येथून परतत अस॔ताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली असल्याची माहीती सूत्रांकडून मीळत असून,त्यांचेसह गाडीचालक जखमी झाल्याचे कळते आहे.
केज तालुक्यातील दहिफळ वड. येथे आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी संगिताताई ठोंबरे या निमंत्रित असल्याने त्या दहिफळ येथील कार्यक्रमाला उपस्थित होत्या . कार्यक्रम आटोपून त्या परत केजकडे जात असतांना त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली असून, त्यामध्ये सौ.संगिताताई ठोंबरे गाडीचालकासह जखमी झाल्याची माहीती त्यांचे यजमान विजयप्रकाश ठोंबरे यांनी दिली . त्यांचेवर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.