केज : केज तालुक्यातील जिवाचीवाडी अंतर्गत हनुमान वस्तीवरील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वरीष्ठ अधिका-यांनी मंडळ अधिकारी सुहास डोरले यांची नियुक्ती केलेली असतांना.या प्रकरणी मंडळ अधिकारी डोरले हे चालढकल करून वरिष्ठ अधिका-यांची दिशाभुल करत असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकाराची तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी दाखल घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील हनुमानवस्ती साठी तत्कालीन तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे रस्ता देण्याऐवजी या रस्त्याला विरोध करणा-यांशी संगणमत करून मंडळ अधिकारी मनमानी कारभार करीत असल्याचे समोर आले आहे.केज चे तहसिलदार यांचे कडुन पुढील तारीख घेण्यासांठी मंडळ अधिकारी यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी प्रत्यक्ष घडलेल्या कामकाजाचा अहवाल सादर करणे गरजेचे आसतानाही मंडळ अधिकारी यांनी 15 दिवस झाले तरी अद्याप तहसीलदार यांना अहवाल सादर केला नसल्याचे दिसतआहे.यावरुन मंडळ अधिकारी हे आपल्या कर्तव्यात किती तत्पर व कर्तव्यदक्ष आहेत हे दिसत आहे. मंडळाधिकारी डोरले हे वरिष्ठ अधिका-यांच्या आदेशाचे पालन न करता मनमानी कारभार करुन अधिका-याच्या आदेशाला केराची टोपली दाखवित असल्याचेच स्पष्ट दिसत आहे. @ 15 दिवसापासून अहवाल सादर होईना… वरीष्ठ अधिका-यांच्या आदेशावरुन 16 ऑगस्ट रोजी नायब तहसिलदार आशा वाघ,मंडळ अधिकारी सुहास डोरले,तलाठी उत्रेश्वर घुले,भुमी अभिलेखचे रविंद्र विभुते यांनी हनुमान वस्ती येथे येऊन केलेल्या कामकाजाचा अहवाल तहसीलदार यांना सादर करणे आवश्यक आसताना अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहीती तह.जमा-२ च्या श्रीमती कावळे मॅडम व तहसिलदार सचिन देशपांडे यांनी सदर प्रतिनीधीशी बोलताना दिली,तर मंडळ अधिका-यांशी संपर्क साधला आसता तरप्रकरणी मंडळ तहसिल कार्यालयाला अहवाल सादर केल्याची ते खोटी माहीती देत आहेत. @ मंडळ अधिकारी बदलण्याची मागणी… उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी सांगुनही मंडळ अधिकारी सुहास डोरले हे राजकीय दबावापोटी अतिक्रमणाला विरोध करणा-या शेतक-यांशी संगणमत करुन त्यांना अभय देऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता कर्तव्यात कसुर करीत आहेत . अधिका-यांची दिशाभुल करीत आहेत,त्यामुळे या प्रकरणी त्यांच्या ऐवजी दुस-या मंडळ अधिका-याची नियुक्ती करुन रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे किंवा तत्कालीन तहसिलदार यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे नदीच्या बाजुने रस्ता उपलब्ध करुन देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांचेकडे हनुमान वस्ती येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.