Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परळीच्या वैद्यनाथ विद्यालयात कर्मचारी भरती घोटाळा.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

परळीच्या वैद्यनाथ विद्यालयात कर्मचारी भरती घोटाळा.

संच मान्यतेपेक्षा ज्यादा व बोगस भरतीमुळे शिक्षकांचे वेतन अडकले! ​शाळेच्या ‘शालार्थ’ प्रणालीत ‘पोस्ट मॅपिंग’ची अडचण;

बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रभारी मुख्याध्यापकाची तातडीच्या मार्गदर्शनाची मागणी.

​परळी वैजनाथ: येथील नामांकित वैद्यनाथ माध्यमिक विद्यालय (स्थापना १९४१) च्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर २०२५ चे वेतन रखडण्याची चिन्हे आहेत. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकांना शालार्थ प्रणालीमध्ये संच मान्यतेपेक्षा ज्यादा व बोगस भरतीमुळे ‘संचमान्यता पोस्ट मॅपिंग’ करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने, त्यांनी थेट बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून यावर तातडीने लेखी मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, ​शाळेच्या माहे नोव्हेंबर २०२५ च्या वेतनाचे देयक शालार्थ प्रणालीत तयार करून मंजुरीसाठी पाठवताना, ‘UDISE Code Mapping and Sancha Manyata Post Mapping Process has not yet been completed’ असा त्रुटी संदेश (Error Message) प्रदर्शित होत आहे. यामुळे देयक पुढील प्रक्रियेसाठी पुढे पाठवता येत नसल्याचे प्रस्तुत पत्रात नमूद करण्यात आले आहे . मंजूर पदे १६, कार्यरत कर्मचारी ५०! ​शाळेला सन २०२४-२५ या वर्षासाठी शिक्षण विभागाची एकूण १६ पदांची संचमान्यता (शिक्षक १४, शिक्षकेतर २) प्राप्त आहे. याउलट, शाळेत प्रत्यक्षात एकूण ५० कर्मचारी कार्यरत आहेत, म्हणजे ३४ कर्मचारी हे संचमान्यतेपेक्षा जादा भरती करण्यात आले आहेत. ​प्रभारी मुख्याध्यापकांनी पत्रात नमूद केल्यानुसार, शालार्थ प्रणाली संचमान्यता एकत्रीकरणानुसार (Integration) फक्त १६ पदांचीच ‘पोस्ट मॅपिंग’ स्वीकारते. उर्वरित ३४ जादा कर्मचाऱ्यांची ‘पोस्ट मॅपिंग’ प्रणाली स्वीकारत नाही, ज्यामुळे वेतनाचे देयक अडकले आहे. ​प्रभारी मुख्याध्यापकांचे तीन महत्त्वाचे प्रश्न: ​प्रभारी मुख्याध्यापकांनी बीडच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे खालील तीन महत्त्वाच्या बाबींवर तातडीने लेखी स्पष्टीकरण आणि मार्गदर्शन देण्याची मागणी केली आहे: ३४ कर्मचारी संचमान्यतेपेक्षा जादा असून, ही बाब प्रशासकीय गैरप्रकार दर्शवते. या अतिरिक्त कर्मचाऱ्यांमुळे शाळेच्या सर्व ५० कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर २०२५ चे वेतन रखडले आहे. ​वेतन देयक शालार्थ प्रणालीत अडकले! ​शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकांना शालार्थ प्रणालीमध्ये ‘पोस्ट मॅपिंग’ करताना ‘UDISE Code Mapping and Sancha Manyata Post Mapping Process has not yet been completed’ असा त्रुटी संदेश येत आहे. संचमान्यता एकत्रीकरणानुसार (Integration) प्रणाली फक्त १६ मंजूर पदांचीच नोंदणी स्वीकारत आहे, त्यामुळे ३४ जादा कर्मचाऱ्यांचा समावेश प्रणालीमध्ये होत नाही आणि परिणामी वेतन देयक पुढील प्रक्रियेसाठी जात नाही. ​गंभीर गैरप्रकारावर बोट: ​प्रभारी मुख्याध्यापकांनी थेट बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून या गंभीर स्थितीवर तातडीने लेखी मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे. या पत्रानेच हा संचमान्यतेपेक्षा अधिक कर्मचारी भरती केल्याचा गैरप्रकार उघड झाला आहे. ​प्रशासकीय गैरप्रकारावर तातडीने निर्देश आवश्यक: ​प्रभारी मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे खालील दोन अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर गैरप्रकाराची जबाबदारी आणि पुढील कार्यवाही यासंदर्भात लेखी स्पष्टीकरण मागितले आहे: ​कर्मचारी निवड: मंजूर १६ पदांपैकी कोणत्या १६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवड ‘पोस्ट मॅपिंग’साठी करावी? ​जादा कर्मचाऱ्यांचे वेतन आणि जबाबदारी: संचमान्यतेबाहेरील (जादा) ३४ कर्मचाऱ्यांच्या वेतन देयक प्रक्रिया, ‘पोस्ट मॅपिंग’ आणि या गंभीर प्रशासकीय गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भात पुढील कार्यवाही कशी करावी? ​या गंभीर अनियमिततेमुळे शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयाने या संचमान्यता गैरप्रकाराची दखल घेऊन तातडीने स्पष्ट लेखी आदेश/मार्गदर्शन द्यावे, अशी मागणी होत आहे. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनानंतरच या ३४ जादा कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीच्या वैधतेवर आणि त्यांच्या वेतनाच्या स्थितीवर स्पष्टता येऊ शकेल.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये