ताज्या घडामोडी

म्हैस अन् दुचाकी चोरणारा सराईत चोरटा एलसीबीच्या जाळ्यात; स्थानिक गुन्हे शाखेकडून एकास अटक, तीन गुन्हे उघड.

पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी :

म्हैस अन् दुचाकी चोरणारा सराईत चोरटा एलसीबीच्या जाळ्यात; स्थानिक गुन्हे शाखेकडून एकास अटक, तीन गुन्हे उघड.

​धारूर / बीड : बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कारवाई करत म्हैस आणि दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत आरोपीकडून ३ विविध पोलीस ठाण्यांतील चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस ठाणे सिरसाळा येथील म्हैस चोरीच्या (गु.र.नं. २४४/२०२६ कलम ३०३(२) BNS) गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मुंजा भगवान मोरे (वय २६, रा. कारी, ता. धारूर, जि. बीड) याने ही चोरी केली असून,तो म्हातारगाव येथे आहे. या माहितीच्या आधारे पोउपनि महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकाने म्हातारगाव येथे सापळा रचून आरोपीला मोटरसायकलसह ताब्यात घेतले. ​चौकशीत ३ गुन्ह्यांची कबुली आरोपीने दिली असून, आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हैस चोरीसह, केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केवड गावातून एक म्हैस आणि परांडा (जि. धाराशिव) येथून एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी वर विविध पोलीस ठाण्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे ​उघडकीस आलेले आहेत: ​सिरसाळा पो.ठाणे: गु.र.नं. २४४/२०२६ ​केज पो.ठाणे: गु.र.नं. ५०९/२०२६ ​परांडा पो.ठाणे: गु.र.नं. ३५०/२०२६. सदरच्या आरोपीकडून खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.​जप्त मुद्देमाल: ७०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून,आरोपीस पुढील तपासासाठी सिरसाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.​पोलीस पथकाची कामगिरी ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने, पोह/बप्पासाहेब घोडके, पोह/महेश जोगदंड, पोह/जफर पठाण, पोह/ दिलीप गीते व चापोह/गणेश मराडे यांच्या पथकाने केली आहे. या कार्यवाहीमुळे परिसरात बीड पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये