ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवरामपुरी पतसंस्थेची  दहावी_शाखा_वडवणीत_कार्यन्वित!  जि.प.चे मा.उपाध्यक्ष विक्रम बप्पांचा बॅकिंग क्षेत्रातला नेत्रदीपक प्रयोग पुन्हा संपन्नपुर्वक यशस्वी!!!

पाठलाग न्युज/प्रतिनिधि:

शिवरामपुरी पतसंस्थेची  दहावी_शाखा_वडवणीत_कार्यन्वित! 

जि.प.चे मा.उपाध्यक्ष विक्रम बप्पांचा बॅकिंग क्षेत्रातला नेत्रदीपक प्रयोग पुन्हा संपन्नपुर्वक यशस्वी!!!                                                          वडवणी/प्रतिनिधि: अलीकडे बँकींग क्षेत्रात अविश्वास व जीवघेणे स्पर्धात्मक वातावरण असतांनासुद्धा बीड जि.प.चे माजी.अध्यक्ष विक्रम बप्पा मुंंडे यांचे मार्गदर्शनाखाली विडा जि.प.चे सदस्य तथा कृष्णा को.अप.अर्बन बँकेचे चेअरमण विजयकांत मुंडे यांनी शिवरामपुरी पतसंस्थेची वडवणी येथे १० वी शाखा यशस्वीपणे उघडून सहकार व बँकिंग क्षेत्रात अगळा-वेगळा उपक्रम केला असल्याच्या असंख्य प्रतिक्रिया उमटत आहेत. या बाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, बीड जि.प.चे मा. उपाध्यक्ष विक्रम बप्पा मुंडे संस्थापक असलेल्या  केज तालुक्यातील विडा येथील शिवरामपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या १० व्या शाखेचा शुभारंभ वडवणी येथे काल गुरूवार दि-१/२/२०२४ रोजी दुपारी ११ वाजता माजी आ.केशव (दादा) आंधळे व बीड जिल्हा परिषेदेचे बांधकाम सभापती जयसिंग (भैय्या) सोळुंखे यांच्या शुभहस्ते तर बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

ह.भ.प.त्रिविक्रमानंद शास्त्री (पिंपळनेरकर),ह.भ.प.विठ्ठल महाराज आंधळे (निळकंठेश्वर मठ संस्थान) यांनी उपस्थित राहून शाखेस आशिर्वाद पर मनोगत व्यक्त केले.प्रसंगी वडवणी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शेषेराव जगताप,उपाध्यक्ष बन्सी (भाऊ) मुंडे,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल चोले,विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य तथा कृष्णा अर्बन को.ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमण विजयकांत (भैय्या) मुंडे,नगरसेवक सुधिरभाऊ ढोले,नगरसेवक सचिन सानप,पी.डी.मुरकूटे गुरूजी,भाजपा नेते सुनिल कदम,देवगावचे सरपंच अतुल (दादा) मुंडे,माजी उपसरपंच विठ्ठल (भाऊ) मुंडे,आधळेवाडीचे सरपंच नामदेव आंधळे,चेअरमण बालाप्रसाद भुतडा,तुळशिराम तोंडे,युवा नेते डाॅ.धनराज पवार,दिपक (आण्णा) वाघमारे,कृष्णा बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी,मुख्य कार्यकारी अधिकारी वसुदेव मुंडे,शिवरामपुरी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मुळे,संचालक ज्योतिराम आंधळे,विठ्ठल भोसले,लिंबराज ढेंगे,नारायण बर्दापुरकर,मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिता पवार यांच्यासह संचालक,सभासद,कर्मचारी व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविण कन्हेरे सर यांनी केले.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये