Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बुलढाणा अर्बन बँक बंद होणार ही अफवा; खातेदारांनी घाबरू नये, बँकेचे स्पष्टीकरण!
पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

बुलढाणा अर्बन बँक बंद होणार ही अफवा; खातेदारांनी घाबरू नये, बँकेचे स्पष्टीकरण!
केज / प्रतिनिधी(दि. ३० डिसेंबर): बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बंद होणार असल्याची अफवा शहरात पसरल्याने आज येथील बँक शाखेत खातेदारांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, बँकेने ही बातमी निव्वळ अफवा असून खातेदारांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये, असे स्पष्ट आवाहन केले आहे. अफवेमुळे भीतीचे वातावरण: अचानक पसरलेल्या या अफवेमुळे खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक खातेदारांनी आपले पैसे आणि सोने सुरक्षिततेच्या दृष्टीने काढून घेण्यासाठी बँकेत गर्दी केली.

बुलढाणा अर्बन बँक गोल्ड लोन सुविधा देत असल्याने अनेक खातेदारांनी आपले सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे. बँक बंद होणार या चर्चेमुळे सोने सोडवून घेण्यासाठी पैसे भरावे लागणार या चिंतेने अनेक ठेवीदारांना सतावत होते. बँक व्यवस्थापन सतर्क, व्यवहार सुरळीत: सध्या या अफवेमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बँक व्यवस्थापन अत्यंत सतर्क झाले आहे.





