Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

​लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे शुक्रवारी आयोजन; मधूरभैय्या मुंडे यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन.

पाठलाग न्यूज / विशेष प्रतिनिधी :

लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे शुक्रवारी आयोजन; मधूरभैय्या मुंडे यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन.

​केज /विशेष प्रतिनिधी: केज शहरापासून जवळच असलेल्या मधुर पेट्रोल पंपा समोर, बीड रोडवरील सिद्धिविनायक शैक्षणिक सेवाभावी संस्था संचलित लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे भव्य वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले असून, हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६:०० वाजता बीड रोड वरील नरसिंग कॉलेजमध्ये संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन मधुरभैय्या मुंडे यांनी दिली. ​या कार्यक्रमाचे उद्घाटन व सत्कारमूर्ती म्हणून अंबाजोगाई नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. नंदकिशोर (काकाजी) मुंदडा उपस्थित राहणार आहेत. तर, प्रमुख पाहुणे म्हणून खालील मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती संस्था प्रशासनाने दिली आहे. ​मा. अंकुशराव इंगळे (सभापती, केज कृषी उत्पन्न बाजार समिती) ​अक्षयभैय्या मुंदडा (भाजप युवा नेते) ​मा. रामभाऊ कुलकर्णी (महाराष्ट्र राज्य भाजप प्रवक्ते) ​मा. राकेश गिड्डे तहसीलदार, केज. ​स्वप्नील उनवणे (पोलीस निरीक्षक, केज) हे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ​याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत (बापू) मुंडे, सचिव सौ. उषाताई मुंडे, चेअरमन मधुरभैय्या मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ​या वार्षिक स्नेहसंमेलनात लक्ष्मी नर्सिंग स्कूलचे प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आपले कला कौशल्य सादर करणार आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला -गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मी नरसिंग कॉलेजचे प्राचार्य रवि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद परिश्रम घेत आहेत. या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कॉलेज व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉक्टर ऋतुजा मुंडे हिने छत्रपती राजर्षी शाहू महाविद्यालय कोल्हापूर आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे सांघिक व वैयक्तिक प्रथम पारितोषक मिळवल्याबद्दल तिचे लक्ष्मी नरसिंग महाविद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन!!💐💐🙏
शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये