Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पटसंख्येअभावी बंद पडलेली केज ची जि. प. शाळा सुरू करण्यासाठी त्याच शाळेच्या मा. विद्यार्थ्यांचा पुढाकार.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी:

पटसंख्येअभावी बंद पडलेली केज ची जि. प. शाळा सुरू करण्यासाठी त्याच शाळेच्या मा. विद्यार्थ्यांचा पुढाकार.

केज:- केज तालुक्यातील एकमेव नावाजलेली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, केज, पटसंख्येअभावी बंद पडली असून, शाळेची भव्य इमारत विद्यार्थ्यांअभावी धूळखात पडली आहे तर,अनेक वर्गांची पडझड झालेली आहे. विद्यार्थी नसल्याने अनेक शिक्षकांच्या बदल्या इतर शाळेवर करण्यात आल्या असून. ही शाळा पुन्हा पूर्व अवस्थेत आणण्यासाठी त्याच शाळेतील अनेक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असल्याचे दिसून येत आहे. केज तालुक्यात २३ खासगी शाळा आहेत. शहरात अनेक इंग्लिश स्कूल, उर्दू शाळा असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी खासगी शाळेत इंग्लिश स्कूलमध्ये जात होती. खासगी शाळेवाले विद्यार्थ्यांना अनेक प्रलोभने दाखवून या शाळेतील विद्यार्थी घेऊन गेले. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या घटली, परिणामी शाळा बंद पडली. या शाळेत माजी केंद्रीय मंत्री स्व. प्रमोद महाजन, कृषी आयुक्त उमाकांत दांगटसह अनेक न्यायाधीश, पोलीस अधिकारी व इतर अधिकारी या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेने बनवले. ती शाळा आज पटसंख्येमुळे बंद पडली आहे. या शाळेला भव्य इमारत आहे. खेळण्यासाठी मोठे मैदान आहे. या शाळेने अनेक राष्ट्रीय खेळाडू बनवले आहेत ते खेळाडू आज मोठे अधिकारी, सैन्य दलात अधिकारी, सैनिक आपली सेवा बजावत आहेत. शाळेत विद्यार्थी नसल्याने वर्गखोल्या रिकाम्या आहेत. आतील फर्निचर चोरटे पळवत आहेत. इमारतीची पडझड होत आहे. मध्यंतरी समाज माध्यमात शाळेच्या दुरवस्थेबद्दल बातम्या छापून आल्यावर माजी विद्यार्थी व्यथित झाले. माजी विद्यार्थ्यांनी व्हॉ ट्सअॅपवर एक ग्रुप तयार केला, त्यात आज १९८० ते १९९५ पर्यंत या शाळेत शिक्षण घेतलेले ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनी जॉईन झाले असून येत्या २६ जानेवारीला हे सर्व एकत्र येऊन मेळावा घेणार आहेत. मेळाव्यात पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवून २०२६ या वर्षात जूनपासून शाळेत पटसंख्या वाढवून पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी गरजू, गरिबाची मुले जे विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत असे विद्यार्थी शोधून वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यात शाळेच्या वर्गाची दुरुस्ती, फर्निचर, विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य देणे इत्यादी कामे मे महिन्यात पूर्ण करून शाळा सुरू करणार आहेत. ही जिल्हा परिषद माध्यमिक शाळा इतर तालुक्यांसाठी पण आदर्श ठरणार आहे. या कार्यासाठी सहाशे विद्यार्थी व इतर सामाजिक संस्था मदत करत आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये