ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीड जिल्ह्याती बालविवाह प्रतिबंधाचा निनाद घुमला. 2000 हून अधिक विद्यार्थ्यांची रॅली! मुलींनी अर्थिक दृष्टया सक्षम व्हावे!!–दिपा मुधोळ-मुंडे.

पाठलाग न्युज/बीड:

बीड जिल्ह्याती बालविवाह प्रतिबंधाचा निनाद घुमला. 2000 हून अधिक विद्यार्थ्यांची रॅली! मुलींनी अर्थिक दृष्टया सक्षम व्हावे!!--दिपा मुधोळ-मुंडे.

बीड :  मुलींनी शिक्षण घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. बालविवाह झाल्याच्या स्थितीत असे शक्य नाही म्हणून सर्वांनी बालविवाह पूर्णपणे बंद होतील यासाठी काम करण्याची गरज आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.

बालविवाह प्रतिबंधाचा संदेश देण्यासाठी आज येथे विद्यार्थी विद्यार्थिनीची एक भव्य रॅली काढण्यात आली. याचा समारोप येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर झाला त्यावेळी त्या बोलत होत्या याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे श्रीकांत कुलकर्णी तसेच बालविवाह निर्मूलन कार्यक्रम समन्वयक सोनिया हंगे यांच्यासह इतर प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बालविवाहाचे नेमकेपणाने तोटे सांगून अशा स्वरूपाचा विवाह होत असल्यास विद्यार्थी व इतरांनी 1098 हेल्पलाइन वर माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी यावेळी केले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्याने असे बालविवाह रोखण्यात शासन यशस्वी होत आहे. याबाबत दोषी व्यक्तींवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की विवाह झाल्यानंतर माहिती मिळाल्यापेक्षा विवाहपूर्वी माहिती मिळाल्यास अधिक प्रभावीपणे उपाययोजना करता येतील. याप्रसंगी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचीही समोयचीत भाषणे झाली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सोनिया हंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी केले. या रॅलीला छत्रपती संभाजी क्रिडांगणावर सुरुवात झाली जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी 2000 हून अधिक संख्येने उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्साही रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. रॅलीत विविध संदेशाचे फलक घेतलेले विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी शिस्तबदरित्या मोठ्या आवाजात घोषणा देत शहरा तील रस्त्यावरून हा संदेश पोहोचविला. रॅली कारंजा रोड, बशीरगंज, बलभीम चौक, धोंडीपुरा, माळीवेस चौक, सुभाष रोड मार्गे जिल्हा क्रीडा संकुलापर्यंत पोहोचली. या रॅलीमध्ये पुढीलप्रमाणे शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रगती विद्यालय बालेपीर 100 विद्यार्थी, संस्कार माध्यमिक विद्यालय 140 विद्यार्थी,मिल्लीया कन्या शाळा, चंपावती माध्यमिक विद्यालय 130 विद्यार्थी,शिवाजी विद्यालय 200 विद्यार्थी,व्यकटेश पब्लीक स्कुल व महाविद्यालय 100 विद्यार्थी, गीता कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय 100 विद्यार्थी, विनायक विद्यालय पेठ बीड 100 विद्यार्थी, डॉ बाबासाहेब आंबेडकर 50 विद्यार्थी, सौ. के. एस. के. महाविद्यालय 45 विद्यार्थी मिल्लीया बॉईज हायस्कुल 120 विद्यार्थी, श्री बंकट स्वामी महाविद्यालय 160 विद्यार्थी यशवंत माध्यमिक विद्यालय 220 विद्यार्थी, अलहा उर्दु हायस्कुल 154 विद्यार्थी, राजस्थानी माध्यमिक विद्यालय 98 विद्यार्थी, राजश्री शाहू कन्या मा. वि. 60 विद्यार्थी, राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय एमपडीसी 150 विद्यार्थी स्वातंत्र्य सैनिक बन्सीधरराव जाधव मा. वि. 106 विद्यार्थी पीपल्स उर्दु हायस्कुल 200 विद्यार्थी, डॉ. भिमराव पिंगळे विद्यालय 80 विद्यार्थी, जयहिंद उर्दु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय 195 विद्यार्थी व्दारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय 75 विद्यार्थी, इकरा उर्दु प्राथमिक शाळा 438 विद्यार्थी कनकालेश्वर विद्यालय 39 विद्यार्थी आणि द.बा. घुमरे पब्लिक स्कुल 200 विद्यार्थी, इंदिरा गांधी मेमोरिएल उर्दु हायस्कुल 200, विद्यार्थी नॅशनल उर्दु जीआर कॉलेज ऑफ अर्ट 50 विद्यार्थी, बलभिम महाविद्यालय, 48 विद्यार्थी, श्री छत्रपती शाहू विद्यालय 80 विद्यार्थी, सावरकर हास्कुल 250 विद्यार्थी बालविवाह प्रतिबंध रॅलित मोठया उत्साहाने सहभागी झाले होते.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये