केजकरांचे अंधारे बापू दिर्घ आजाराने कालवश.दुपारी ३ च्या दरम्यान सोनीजवळा रस्त्यानजिक अंत्यसंस्कार.
प्रतिनिधी:/केज: केज शहरातील रविराज हाॅटेलचे मालक तथा प्रसिद्ध व्यापारी सज्जन बापू अंधारे यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. मागील बर्याच दिवसांपासून बापू शरीर प्रकृतीने व वयोमानानुसार आजारी असले तरी सर्वांसोबत ते हसतमुखाने प्रतिसाद देत होते.आज दुपारी तीन वाजता सोनीजवळा रस्त्यालगत असलेल्या हनुमान मंदिर परिसरातील केज येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.बापूंच्या निधनाचे वृत्त कळताच संपुर्ण केज शहरावर दु:खाची छाया पसरली असून, अनेक मान्यवरांनी बापूंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.