केज / प्रतिनिधी : स्थानिक ‘लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूल, केज’ या संस्थेच्या द्वितीय वर्षाचा (GNM 2nd Year) निकाल १००% लागला असून विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. संस्थेच्या उत्कृष्ट शैक्षणिक परंपरेला साजेसा निकाल लागल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. या परीक्षेत गुणवत्तेनुसार अव्वल स्थान पटकावणारे विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत: वैष्णवी पांडुरंग आंधळे – ८२.५७% (Distinction)ओम भवती दिनकर रंगे – ८०.४२% (Distinction)प्रदीप रामचंद्र मुंडे – ७८.५१% (First Division)अंजली वैजनाथ छोले – ७८.००% (First Division)प्रियंका प्रल्हाद खरात – ७७.७१% (First Division)निकिता विनोद मोरे – ७७.५७% (First Division)शिवम सिद्धेश्वर मुंडे – ७६.४२% (First Division)तेजस मिलिंद पवार – ७४.७१% (First Division)प्रतीक्षा माने – ७४.५७% (First Division) विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष रमाकांत बापू मुंडे, युवा नेते मधूर भैया मुंडे, माजी जि.प. सदस्या उषाताई मुंडे तसेच संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. “तुमच्या यशाने आमचा अभिमान आणि संस्थेचा गौरव वाढला आहे,” अशा शब्दांत संस्थापक अध्यक्ष रमाकांत बापू मुंडे व संस्था प्रशासनाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.