ताज्या घडामोडी

लोकनेते कै. बाबुरावजी आडसकर यांच्या १० व्या पुण्यस्मरणानिमित्त आडस येथे भावपूर्ण अभिवादन ​अंकुर महाराज साखरे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने परिसर भक्तिमय; विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठी उपस्थिती.

पाठलाग न्यूज.

लोकनेते कै. बाबुरावजी आडसकर यांच्या १० व्या पुण्यस्मरणानिमित्त आडस येथे भावपूर्ण अभिवादन ​अंकुस महाराज साखरे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने परिसर भक्तिमय; विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठी उपस्थिती.

​आडस: लोकनेते तथा माजी आमदार कै. बाबुरावजी आडसकर (तात्या) यांच्या १० व्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी आडस येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी कै. बाबुरावजी आडसकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी अभिवादन करण्यासाठी आणि आडसकर कुटुंबावर प्रेम करणाऱ्या नागरिक व कार्यकर्त्यांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. ​भक्तीमय वातावरणात रंगले कीर्तन ​प्रतिमा पूजनानंतर ह. भ. प. कीर्तनकेसरी अंकुस महाराज साखरे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यांच्या भावपूर्ण कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

यावेळी कै. तात्यांच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा उजाळा देण्यात आला. सत्तरच्या दशकात आडससारख्या ग्रामीण भागातून पुढे येत आमदारपद भूषवून ‘लोकनेते’ म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. ग्रामीण भागातील विकास, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण उपस्थित मान्यवरांनी केले. ​’तात्यांच्या पुण्याईने रमेशराव आडसकर यांचे कर्तृत्व बहरले’ ​यावेळी उपस्थित मान्यवरांनी कै. बाबुरावजी आडसकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “तात्यांच्या पुण्याईने रमेशराव आडसकर यांचे कर्तृत्व बहरले आहे. भविष्यात सर्वांच्या आशीर्वादाने त्यांना राजकारणात चांगले दिवस येतील.” असा सूतोवाच करत आम्ही आडसकर कुटुंबासोबत कायम खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ​जनहिताच्या कामासाठी सदैव प्रयत्नशील राहणार : रमेशराव आडसकर ​आभार प्रदर्शन करताना रमेशराव आडसकर यांनी कै. बाबुरावजी आडसकर यांच्या १० व्या पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित राहून अभिवादन करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. ​”उपस्थित नागरिकांचे आशीर्वाद व साथ यामुळे जनहिताचे काम करण्याची प्रेरणा मिळते. स्व. तात्या आणि स्व. मेघराज आडसकर यांचे आशीर्वाद तसेच सर्वांची साथ घेऊन सर्व जाती-धर्माच्या कार्यकर्त्यांना सोबत ठेवत विकासकामांसाठी यापुढेही सदैव प्रयत्नशील राहणार,” असा निर्धार रमेशराव आडसकर यांनी व्यक्त केला. ​मान्यवरांची उपस्थिती ​या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी केज, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव, परळी, गेवराई तसेच आडस पंचक्रोशीतील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ​कार्यक्रमास माजी आमदार संजयजी दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्र्वर आबा चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ कुलकर्णी, राजकिशोर पापा मोदी, अंकुशराव इंगळे, हनुमंत काका मोरे, रमाकांत बापू मुंडे, राहुल भैया सोनवणे, संतोष दादा हंगे, राजेभाऊ मुंडे, नगराध्यक्ष सिताताई बनसोडे, डॉ. अंजलताई घाडगे, हारूनभाई इनामदार, भाई मोहन गुंड, भगवान केदार, डॉ. वासुदेव नेहरकर, विष्णू घुले, पाशाभाई शेख, ईश्वर मुंडे, धैर्यशीलजी देशमुख, माधवराव निर्मळ, धनंजय देशमुख (मस्साजोग), डॉ. इंगोले यांच्यासह आजी-माजी जि. प., पं. स. व ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, शिक्षण व आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती, पत्रकार आणि स्नेही मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. ​उत्कृष्ट नियोजन ​कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आडसकर कुटुंबातील अर्चना ताई आडसकर, ऋषीभैय्या आडसकर व रंजितदादा आडसकर, शशी भैया आडसकर यांनी उत्तम व्यवस्थापन केले. तसेच छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी भोजन व्यवस्थेची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळली.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये