केज: खामगाव – केज व नगर-लातूर या दोन महामार्गावरील मध्यवर्ती बस स्थानकावरुन प्रवाशांच्या व्यवस्थेसाठी सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत आरक्षणाची व्यवस्था केली असल्याची माहीती केज येथील आगारप्रमुख नवनाथ चौरे यानी दिली असून, प्रवाशानी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे. याबाबत अधिक महीती अशी की, पंढरपूर महामार्गावर केज हे बसस्थानक आहे,सध्या दीपावलीनिमित्त प्रवाश्याची रहदारी खूप मोठया प्रमाणात आहे. सदर ठिकाणाहुन पुणे, मुंबई, ठाणे, बोरिवली, कोल्हापूर, संभाजीनगर, हैद्राबाद इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशाची संख्या खूप जास्त आहे. प्रवाशी बंधू, भगिनींचा विविध सवलतीसह प्रवास अधिक सुखकर व्हावा आणि वाढती गर्दी लक्षात घेऊन सकाळी 6=00 ते रात्री 10=00 वाजेपर्यंत आरक्षण कक्ष चालू ठेवण्याचा नावीन्यपूर्ण निर्णय धारूर आगारप्रमुख यांनी घेतला आहे. सदरील पूर्णवेळ आरक्षणाचा लाभ सर्व प्रवासी बंधू भगिनींनी घ्यावा असे आवाहन आगारप्रामुख श्री. नवनाथ चौरे यांनी केले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.