खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात ‘शिवसंवाद दौरा’; जालना, हिंगोली, नांदेड आणि बीड जिल्ह्यात विधानसभा निहाय आढावा बैठकांचे आयोजन.
विशेष प्रतिनिधी/ मुंबई: शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आगामी २७ मे ते २९ मे २०२६ दरम्यान जालना, हिंगोली, नांदेड आणि बीड जिल्ह्यांमध्ये ‘शिवसंवाद दौरा’ आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने विधानसभा निहाय महत्त्वपूर्ण आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून अधिकृत पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या झंझावाती दौऱ्यात विविध विधानसभा मतदारसंघांमधील राजकीय परिस्थिती, पक्ष संघटना आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. ‘शिवसंवाद’ दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम खालील टाईम टेबल नुसार आहे. बुधवार, २७ मे २०२६ सकाळी १०.०० वा. – जालना, भोकरदन आणि बदनापूर विधानसभा आढावा बैठक (स्थान: जालना शहर, जि. जालना) दुपारी १.०० वा. – घनसावंगी आणि परतूर विधानसभा आढावा बैठक (स्थान: ता. घनसावंगी, जि. जालना) संध्याकाळी ६.०० वा. – नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर आणि लोहा विधानसभा आढावा बैठक (स्थान: नांदेड शहर, जि. नांदेड) गुरुवार, २८ मे २०२६ सकाळी १०.०० वा. – नायगाव, मुखेड आणि देगलूर विधानसभा आढावा बैठक (स्थान: ता. नायगाव, जि. नांदेड) दुपारी ३.०० वा. – किनवट, हदगाव आणि भोकर विधानसभा आढावा बैठक (स्थान: ता. हदगाव, जि. नांदेड) संध्याकाळी ६.०० वा. – हिंगोली, कळमनुरी आणि वसमत विधानसभा आढावा बैठक (स्थान: हिंगोली शहर, जि. हिंगोली) शुक्रवार, २९ मे २०२६ सकाळी १०.०० वा. – परळी आणि कैज विधानसभा आढावा बैठक (स्थान: ता. कैज, जि. बीड) दुपारी २.०० वा. – बीड आणि माजलगाव विधानसभा आढावा बैठक (स्थान: बीड शहर, जि. बीड) संध्याकाळी ५.०० वा. – आष्टी आणि गेवराई विधानसभा आढावा बैठक (स्थान: ता. पाटोदा, जि. बीड) प्रमुख नेत्यांची असणार उपस्थिती या संपूर्ण दौऱ्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने: श्री. भरतशेट गोगावले (मंत्री व शिवसेना संपर्क मंत्री – बीड जिल्हा) श्री. प्रकाश आबिटकर (मंत्री व शिवसेना संपर्क मंत्री – नांदेड आणि हिंगोली जिल्हा) श्री. आशिष जयस्वाल (मंत्री व शिवसेना संपर्क मंत्री – जालना जिल्हा) श्री. संदीपान भुमरे (खासदार व शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख – जालना) श्री. भाऊसाहेब चौधरी (शिवसेना सचिव) श्री. आनंद परांजपे (माजी खासदार) पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन या आढावा बैठकांसाठी संबंधित जिल्ह्यातील सर्व आजी-माजी खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि सरपंच यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच पुरुष व महिला आघाडी, युवासेना, सर्व संपर्क मंत्री, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, बूथ प्रमुख (BLA 1) आणि सर्व अंगीकृत संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या बैठकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या वतीने करण्यात आले आहे. या दौऱ्यामुळे मराठवाड्याच्या राजकीय वर्तुळात शिवसेनेकडून मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.